आशाताईंना अखेरची सलामी देताना नात जनाई भोसलेनं फोडला टाहो, भावुक व्हिडीओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 14:04 IST2026-04-13T14:04:03+5:302026-04-13T14:04:26+5:30

आशा भोसलेंची नात जनाई भोसले हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

Asha Bhosle Funeral Granddaughter Zanai Bhosle Breaks Down While Paying Her Last Respects Video Mumbai | आशाताईंना अखेरची सलामी देताना नात जनाई भोसलेनं फोडला टाहो, भावुक व्हिडीओ समोर

आशाताईंना अखेरची सलामी देताना नात जनाई भोसलेनं फोडला टाहो, भावुक व्हिडीओ समोर

भारतीय संगीत क्षेत्रातील एक देदीप्यमान तारा निखळला आहे. काल गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. आपल्या लाडक्या आजीला अखेरची सलामी देताना नात जनाई भोसले ही भावुक झालेली दिसली.

आशा भोसले यांच्या पार्थिवाला तिरंग्यातून राष्ट्रीय सन्मान देण्यात आला. यावेळी नात जनाई भोसले पूर्णपणे कोलमडून गेल्याचं दिसलं. आजीला अखेरचा निरोप देताना जनाईला अश्रू अनावर झाले. ती वारंवार आपले डोळे पुसताना दिसली. हा व्हिडीओ पाहून अनेक चाहत्यांच्या भावनांचा बांध फुटला आहे.

जनाई भोसले आणि आशा ताई यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते. जनाई अनेकदा सोशल मीडियावर आजीसोबतचे आनंदी क्षण, फोटो आणि व्हिडीओ शेअर करायची. केवळ घरातच नाही, तर सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही या दोघींचा वावर अनेकांचे लक्ष वेधून घ्यायचा. 


मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये हजारो अजरामर गाणी देणाऱ्या आशा भोसलेंनी प्रत्येक रसिकाच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले. आज जरी त्या  आपल्यात नसल्या, तरी त्यांच्या आवाजातील जादू आणि त्यांनी गायलेली असंख्य गाणी पिढ्यानपिढ्या संगीतप्रेमींच्या मनात जिवंत राहतील.
 

Web Title : आशा भोसले को अंतिम विदाई देते हुए नातिन जनई भावुक।

Web Summary : भारतीय संगीत की महान गायिका आशा भोसले का 92 वर्ष की आयु में निधन हो गया। अंतिम विदाई में उनकी नातिन जनई भावुक हो गईं। आशा ताई को राष्ट्रीय ध्वज से सम्मानित किया गया। दोनों का रिश्ता बहुत खास था।

Web Title : Granddaughter's tearful farewell as Asha Bhosle receives final salute.

Web Summary : Asha Bhosle, a radiant star in Indian music, passed away at 92. Her granddaughter, Janai Bhosle, was overcome with emotion during the final farewell, as Asha Tai was honored with the national flag. Their bond was cherished by many.