अर्जुन म्हणतो,‘हर्षवर्धन हा स्टार किड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 12:20 IST2016-06-15T06:50:51+5:302016-06-15T12:20:51+5:30

 बॉलीवूड हे संपूर्णपणे कपूर खानदानाने भरलेले आहे. आता बॉलीवूडमध्ये आणखी एका कपूरची म्हणजेच अनिल कपूरच्या मुलाची हर्षवर्धन कपूरची एन्ट्री ...

Arjun says, 'Harsh Vardhan is the Star Kid' | अर्जुन म्हणतो,‘हर्षवर्धन हा स्टार किड’

अर्जुन म्हणतो,‘हर्षवर्धन हा स्टार किड’

 
ॉलीवूड हे संपूर्णपणे कपूर खानदानाने भरलेले आहे. आता बॉलीवूडमध्ये आणखी एका कपूरची म्हणजेच अनिल कपूरच्या मुलाची हर्षवर्धन कपूरची एन्ट्री ‘मिर्झ्या’ च्या निमित्ताने होणार आहे.

हर्षवर्धनचा चुलत भाऊ अर्जुन कपूर त्याच्याविषयी म्हणतो, ‘ हर्षवर्धन याला कौटुंबिक वातावरण आहे. शेवटी तो अनिल कपूरचा मुलगा आहे. माध्यमे देखील त्याला स्टार किड म्हणूनच वागवणार आहेत. त्यामुळे मला तरी असे वाटते की, त्याने लगेचच चाहत्यांना आपलेसे करायला सुरूवात करावी.

कारण चाहते त्याच्याकडे येतील आणि त्याला त्याच्या वडिलांच्या कामाबद्दलची पावती देतील. त्याने ती बाब एन्जॉय केली पाहिजे. वडीलांपेक्षा जास्त चाहते त्याने कमवायला हवेत.’ 

Web Title: Arjun says, 'Harsh Vardhan is the Star Kid'