'या' दोन चित्रपटात एकत्र दिसणार अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 17:23 IST2017-08-03T11:47:54+5:302017-08-03T17:23:29+5:30

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे एका मागोमाग एका चित्रपटात एकत्र काम करण्यास नकार देतात. कारण प्रेक्षक त्याच-त्याच जोड्या ...

Arjun Kapoor and Parineeti Chopra will be seen together in two films | 'या' दोन चित्रपटात एकत्र दिसणार अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा

'या' दोन चित्रपटात एकत्र दिसणार अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा

लिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे एका मागोमाग एका चित्रपटात एकत्र काम करण्यास नकार देतात. कारण प्रेक्षक त्याच-त्याच जोड्या स्क्रिन पाहाणे पसंत करत नाहीत. मात्र बॉलिवूडमधले सध्याचे स्टार्स असा विचार करत नाही. अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा दोघेही दोन चित्रपटात एकामागोमाग एकत्र दिसणार आहेत.  
या दोघांच्या पहिल्या चित्रपटाचे नाव आहे 'संदीप और पिंकी फरार' तर दुसऱ्या चित्रपटाचे नाव आहे 'नमस्ते कनाडा'. रिपोर्टनुसार संदीप आणि पिंकी फरार या चित्रपटाचे शूटिंग अर्जुन कपूरने सुरु केले आहे आणि लवकरच त्याला परिणीती चोप्रासुद्धा शूटिंगला सुरु करणार आहे. 'संदीप और पिंकी फरार' चित्रपटाच्या शूटिंगनंतर अर्जुन आणि परिणीती नमस्ते कनाडाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. हा चित्रपट अक्षय कुमारच्या नमस्ते लंडनचा सीक्वल असणार आहे. 

अर्जुन कपूरचा नुकताच 'मुबारकां' चित्रपट रिलीज झाला आहे. ज्यात पहिल्यांदाच अर्जुन आणि अनिल कपूर ही काका-पुतण्याची जोडी स्क्रिनवर एकत्र दिसली होती. अर्जुन आणि अनिलशिवाय यात इलियाना डिक्रूझ आणि अथिया शेट्टीची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात अर्जुन कपूरचा डबल रोल आहे. तर परिणीती सध्या अजय देवगणसोबत आगामी चित्रपट गोलमाल अगेनच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. अर्जुन आणि परिणीती इश्कजादे चित्रपटात एकत्र झळकले होते. इश्कजादेमधील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. त्यामुळे आगामी दोन्ही चित्रपट पाहण्याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना नक्कीच असेल.         

Web Title: Arjun Kapoor and Parineeti Chopra will be seen together in two films