अरिजित सिंहने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानची मागितली माफी; नेमकं घडलं काय ? पाहा Video!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 08:33 AM2024-04-29T08:33:52+5:302024-04-29T08:35:33+5:30

व्हायरल व्हिडीमध्ये अरिजित सिंह हा माहिरा खानची माफी मागताना पाहायला मिळत आहे. 

Arijit Singh Apologizes To Pakistani Actress Mahira Khan You Will Be Shocked To Know The Reason | अरिजित सिंहने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानची मागितली माफी; नेमकं घडलं काय ? पाहा Video!

अरिजित सिंहने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानची मागितली माफी; नेमकं घडलं काय ? पाहा Video!

माहिरा खान ही पाकिस्तानी अभिनेत्री असली तरी जगभरात तिचे चाहते आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये माहिरा कान दुबईमध्ये बॉलिवूड गायक अरिजित सिंहच्या कॉन्सर्टमध्ये एन्जॉय करताना पाहायला मिळत आहे. या कॉन्सर्टमध्ये अरिजित सिंहने रईस चित्रपटातील 'जालिमा' हे गाणं गायलं. ज्यामध्ये माहिरा आणि शाहरुखची जोडी होती. या व्हायरल व्हिडीमध्ये अरिजित सिंह हा माहिरा खानची माफी मागताना पाहायला मिळत आहे. 

अरिजित सिंहने लाईव्ह कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी अभिनेत्रीची माफी मागितली. माहिराला पहिल्या नजरेत ओळखू न शकल्यानं अरिजित सिंहने दिलगीरी व्यक्त केली.  व्हिडीओमध्ये अरिजित सिंग म्हणतोय, 'तुम्हाला आश्चर्य वाटेल...आपण कॅमेरा थोडा इकडे वळवू शकतो का? मी या व्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा मला आठवलं की मी त्याच्यासाठी एक गाणं गायलं होतं. मित्रांनो माहिरा खान माझ्या समोर आहेत आणि मी त्याचं 'जालिमा' गाणं गात आहे.  त्या समोर उभ्या आहेत, पण, त्यांना पाहताच ओळखू शकलो नाही. मला क्षमा करा मॅडम, धन्यवाद आणि खूप खूप धन्यवाद'.

व्हिडीओमध्ये माहिरा खान ही ब्लॅक आऊटफीटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानी उद्योगपती सलीम करीमसोबत दुसरं लग्न केलं. अलीकडेच तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्याही चर्चेत होत्या.  माहिरा खानने 'हमसफर', 'बिन रोये', 'हम कहाँ से सच्चे' सारखे पाकिस्तानचे अनेक लोकप्रिय शो केले आहेत. तर तिनं 2016 मध्ये 'रईस' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, ज्यामध्ये किंग खान शाहरुखबरोबर ती झळकली होती. 
 

Web Title: Arijit Singh Apologizes To Pakistani Actress Mahira Khan You Will Be Shocked To Know The Reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.