Anushka Sharma : वामिका अन् अकायचं पहिलं रक्षाबंधन, अनुष्काने दाखवली खास झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 11:54 IST2024-08-20T11:53:04+5:302024-08-20T11:54:22+5:30

अनुष्का - विराटच्या मुलांचं पहिलं रक्षाबंधन, फोटो झालेत व्हायरल

Anushka Sharma Virat kohli child Vamika and Akaay first Raksha Bandhan 2024 in London photo viral | Anushka Sharma : वामिका अन् अकायचं पहिलं रक्षाबंधन, अनुष्काने दाखवली खास झलक

Anushka Sharma : वामिका अन् अकायचं पहिलं रक्षाबंधन, अनुष्काने दाखवली खास झलक

Vamika-Akaay Raksha Bandhan 2024 : ओवाळीते भाऊराया... वेड्या बहिणीची रे वेडी माया माया असं म्हणत १९ ऑगस्टला राखी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला.  सण म्हटला की प्रत्येकाच्या घरीच उत्साहाचे वातावरण असते. मग ते अगदी हातावर पोट असणारा कष्टकरी वर्ग असो किंवा मग स्टार्स असो. अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat kohli) यांच्या मुलांनीदेखील राखीपौर्णिमा साजरी केली. याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अनुष्का आणि विराटची मुलगी वामिका (Vamika) आणि मुलगा अकाय (Akaay) यांचं पहिलं रक्षाबंधन होतं.  बहीण-भावाच्या नात्याचे ऋणानुबंध राखीच्या धाग्यात बांधण्याचा रक्षाबंधन सण हा वामिका आणि अकायने साजरा केला. अनुष्काने वामिका आणि अकायच्या रक्षाबंधनाची एक झलक चाहत्यांना दाखवली. तिने शेअर केलेला फोटो प्रचंड क्यूट आहे.

अनुष्का शर्मा हिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मुलगी वामिका आणि अकाय यांचा चेहरा दिसत नाही. पण, दोन राख्या दिसून येत आहेत. एक राखी हिरव्या रंगाची आणि दुसरी राखी नारंगी रंगाची आहे. अनुष्काने  कॅप्शनमध्ये ‘हॅप्पी रक्षाबंधन’ आणि दोन गुलाबी हार्टवाले इमोजी शेअर केले आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र अनुष्का आणि विराटच्या मुलांचीचं चर्चा आहे. 

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून अनुष्का लंडनमध्येच वास्तव्यास आहे. गेल्या डिसेंबर महिन्यातच मुलगी वामिकासोबत अनुष्का लंडनमध्ये शिफ्ट झाली, तेव्हापासून ती तिथेच राहत आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात अनुष्काने मुलाला जन्म दिला. अनुष्का आणि विराट हे दोघेही जण पहिल्यापासून खाजगी आयुष्य जगणं पसंत करतात. त्यांची लेक वामिकाच्या जन्माला चार वर्ष उलटले तरी तिची एक झलकही आजवर दाखवलेली नाही. त्यामुळेच आपलं खाजगी जीवन जगण्यासाठी या जोडप्यानं कायमचं लंडनमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.
 

Web Title: Anushka Sharma Virat kohli child Vamika and Akaay first Raksha Bandhan 2024 in London photo viral