'भारताचे वीर आपलं संरक्षण करत आहेत', अनुष्का शर्माने पोस्ट शेअर करत मानले सैन्याचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 14:21 IST2025-05-09T14:18:24+5:302025-05-09T14:21:51+5:30
Anushka Sharma post for Indian Army: अनुष्का शर्माचे वडील सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर आहेत.

'भारताचे वीर आपलं संरक्षण करत आहेत', अनुष्का शर्माने पोस्ट शेअर करत मानले सैन्याचे आभार
Anushka Sharma post for Indian Army:भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या तणावाची परिस्थिती आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' मधून पाकिस्तानला उत्तर दिलं. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले मात्र पाकचं मोठं नुकसान झालं. त्यामुले पाकिस्तानने काल रात्री जम्मूवर ड्रोन हल्ला केला. पाकचा हा हल्ला भारतीय जवानांनी हाणून पाडला. काल रात्री भारत पाक दरम्यान युद्धाचंच वातावरण निर्माण झालं होतं. भारतीय सैनिकांसाठी सर्व देशवासियांनी प्रार्थना केली. अभिनेत्री अनुष्का शर्माने(Anushka Sharma) नुकतीच जवानांसाठी पोस्ट लिहिली आहे.
अनुष्का शर्माने नुकतंच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले, "भारतीय सशस्त्र दलाचे मनापासून आभार. सध्याच्या कठीण प्रसंगी ते वीरांसारखे आपलं संरक्षण करत आहेत. देशासाठी त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं योगदान फार मोलाचं आहे. जय हिंद."
अनुष्काच्या या पोस्टवर विराट कोहलीनेही 'जय हिंद' अशी कमेंट केली आहे. शिवाय त्यानेही पोस्ट शेअर करत भारतीय सैनिकांना अभिवादन केलं आहे. दरम्यान या तणावाच्या परिस्थितीत आयपीएल सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहेत.
अनुष्काचे वडीलही भारतीय सैन्यात होते
अनुष्का शर्माचे वडील अजय कुमार शर्मा निवृत्त सैन्य अधिकारी आहेत. कर्नल पदावर ते सेवानिवृत्त झाले. १८८२ सालापासून के कारगील युद्धापर्यंत त्यांनी सैन्यात भूमिका बजावली होती.