पहिल्या दिवशी पापाराझींनी दुर्लक्ष केलं तर दुसऱ्या दिवशी...; आलिया भटचा 'कान्स'मधील आणखी एक व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 11:43 IST2026-05-14T11:40:30+5:302026-05-14T11:43:09+5:30

पहिल्या दिवशी पीच रंगाच्या गाऊनमध्ये आलिया भटने रेड कार्पेटवर हजेरी लावली. परंतु आलियाकडे समोर उपस्थित असलेल्या पापाराझींनी साफ दुर्लक्ष केलं. आलिया दुसऱ्या दिवशीही रेड कार्पेटवर उपस्थित होती. तेव्हा काय घडलं?

alia bhatt at cannes 2026 paparazzi ignored her on the first day and second day she clicked | पहिल्या दिवशी पापाराझींनी दुर्लक्ष केलं तर दुसऱ्या दिवशी...; आलिया भटचा 'कान्स'मधील आणखी एक व्हिडीओ व्हायरल

पहिल्या दिवशी पापाराझींनी दुर्लक्ष केलं तर दुसऱ्या दिवशी...; आलिया भटचा 'कान्स'मधील आणखी एक व्हिडीओ व्हायरल

आलिया भट सध्या चांगलीच चर्चेत आहे. आलिया सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मुळे चर्चेत आहे. हा फेस्टिव्हल आलिया तिच्या ग्लॅमरस अदांनी गाजवत आहे. पहिल्या दिवशी पीच रंगाच्या गाऊनमध्ये आलिया भटने रेड कार्पेटवर हजेरी लावली. परंतु आलियाकडे समोर उपस्थित असलेल्या पापाराझींनी साफ दुर्लक्ष केलं. त्यामुळे आलियाचे चाहते नाराज झाले. अशातच आलिया दुसऱ्या दिवशीही रेड कार्पेटवर उपस्थित होती. तेव्हा काय घडलं?

दुसऱ्या दिवशी आलियासोबत काय घडलं?

आलिया भटचा कान्समधील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओत आलियाची एन्ट्री होताच पापाराझी तिचे फोटो काढायला पुढे येतात.  पहिल्या दिवशी अभिनेत्रीकडे दुर्लक्ष केलेले हेच पापाराझी आलियाचे फोटो आणि व्हिडीओ काढताना दिसत आहेत. आलियाचे हे व्हिडीओ पाहताच चाहते सुखावले आहेत. पहिल्या दिवशी ज्या आंतरराष्ट्रीय पापाराझींनी आलियाला नाकारलं आज तेच स्वतःहून तिचे फोटो - व्हिडीओ कैद करताना दिसत आहेत. आलिया सुद्धा स्वतःहून पोज देत ग्लॅमरस अदा दाखवताना दिसली.



आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी बिग-बजेट चित्रपटांमुळे चर्चेत आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील 'अल्फा' (Alpha) या चित्रपटात ती झळकणार आहे. १० जुलै २०२६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये ती शर्वरी वाघसोबत मुख्य भूमिकेत दिसेल. याशिवाय, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'लव्ह अँड वॉर' (Love and War) हा तिचा बहुप्रतीक्षित चित्रपट २० मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे, ज्यात ती रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

Web Title : आलिया भट्ट कान्स: पहले अनदेखी, फिर पैपराज़ी ने सराहा।

Web Summary : आलिया भट्ट की कान्स फिल्म फेस्टिवल यात्रा में विपरीत प्रतिक्रियाएँ देखी गईं। पहले पैपराज़ी द्वारा अनदेखा किए जाने के बाद, उन्होंने बाद में उनका ध्यान आकर्षित किया। उनकी आगामी फिल्मों में 'अल्फा' और 'लव एंड वॉर' शामिल हैं।

Web Title : Alia Bhatt's Cannes journey: Ignored, then adored by paparazzi.

Web Summary : Alia Bhatt's Cannes Film Festival journey saw contrasting reactions. Initially ignored by paparazzi, she later gained their attention. Her upcoming films include 'Alpha' and 'Love and War'.