अजय देवगणच्या 'मैदान'ला तारीख मिळेना! बोनी कपूर म्हणाले, "काही लोकांना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 14:15 IST2023-09-26T14:13:52+5:302023-09-26T14:15:03+5:30

'मैदान' का होतोय सतत पोस्टपोन? कोणाला घाबरला अजय देवगण..?

Ajay Devgan s film Maidaan getting postponed Boney Kapoor said vfx work is pending | अजय देवगणच्या 'मैदान'ला तारीख मिळेना! बोनी कपूर म्हणाले, "काही लोकांना..."

अजय देवगणच्या 'मैदान'ला तारीख मिळेना! बोनी कपूर म्हणाले, "काही लोकांना..."

अजय देवगणचा (Ajay Devgn) बहुप्रतिक्षित सिनेमा 'मैदान' (Maidaan) ची रिलीज डेट गेल्या अनेक महिन्यांपासून पोस्टपोन होत आहे. चाहत्यांना सिनेमाबद्दल प्रचंड आतुरता आहे मात्र सतत रिलीज डेट पुढे ढकलण्याचं कारण काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबत अनेक चर्चाही होत आहेत. सिनेमाच्या बजेटमुळेच रिलीज डेट पुढे ढकलली जात असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. इतकंच नाही तर सिनेमा डबाबंद झाल्याचीही अफवा पसरली. आता यावर निर्माते बोनी कपूर यांनी मौन सोडलं आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर म्हणाले, 'मी सिनेमाचा काही भाग चेन्नईतील जवळपास ३०० लोकांना दाखवला आणि त्यांना सिनेमा खूप आवडला. चित्रपटाचं शूट पूर्ण झालं आहे. आता व्हीएफएक्सचं काम सुरु आहे. जे पूर्ण होण्यासाठी आणखी काही वेळ लागेल.'

ते पुढे म्हणाले,'लोक बोलत आहेत की फिल्मचं बजेट जास्त आहे  आणि त्यामुळेच सिनेमा रिलीज होत नाहीए. त्यांना मी सांगू इच्छितो की असं काही नाहीए. सिनेमाचं बजेट वाढलेलं नाही. मैदान हा एक युनिक सिनेमा आहे. सिनेमाची माऊथ पब्लिसिटी खूप होईल. जशी आमीर खानच्या दंगलला प्रसिद्धी मिळाली. सध्या आम्ही वेळ घेत आहोत आणि रिलीजसाठीची वेळ शोधत आहोत. आम्हाला कोणतीच घाई करायची नाही.'

 रिपोर्ट्सनुसार, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सिनेमाची रिलीज डेट पुढे येईल. येत्या काही महिन्यात 'टायगर 3', 'डंकी', 'अॅनिमल'  सारखे बिग बजेट चित्रपट रांगेत आहेत. अशात मैदानसाठी कोणती डेट निवडतील हे बघण्यासारखे असेल.'

मैदान' भारतीय फुटबॉल टीमचे माजी कर्णधार सैय्यद अब्दुल रहीमवर आधारित आहे. अमित शर्मा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. अजय देवगणसोबतच सिनेमात प्रियमणि,  गजराज राव आणि रुद्रनील घोष यांचीही भूमिका आहे. 

Web Title: Ajay Devgan s film Maidaan getting postponed Boney Kapoor said vfx work is pending