काय चाललंय काय? आशिष शेलार यांच्यानंतर आता श्रीकांत शिंदे सलमानच्या भेटीला, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 11:39 AM2024-04-12T11:39:55+5:302024-04-12T11:41:03+5:30

आधी आशिष शेलार, आता श्रीकांत शिंदे! भाईजानच्या भेटीमागचं कारण काय?

after bjp aashish shelar shivsena mp shrikant shinde meets salman khan photo viral | काय चाललंय काय? आशिष शेलार यांच्यानंतर आता श्रीकांत शिंदे सलमानच्या भेटीला, फोटो व्हायरल

काय चाललंय काय? आशिष शेलार यांच्यानंतर आता श्रीकांत शिंदे सलमानच्या भेटीला, फोटो व्हायरल

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान चर्चेत आला आहे. चित्रपट आणि अॅक्शनमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारा भाईजान सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपा नेते आशिष शेलार सलमान खानच्या भेटीला गेले होते. त्यानंतर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी सलमानची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी सलग भाईजानची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण  आलं आहे. 

आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वीच सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. भाईजानच्या कुटुंबीयांबरोबरचा फोटो आशिष शेलार यांनी ट्वीट केला होता. त्यानंतर आता शिंदे गटाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी सलमान खानची भेट घेतली आहे. श्रीकांत शिंदेंनी ईदनिमित्त भाईजानच्या घरी जाऊन त्याला खास शुभेच्छा दिल्या. यावेळी सलामनचे वडील सलीम खान आणि अरबाज खानही उपस्थित होते. श्रीकांत शिंदेंनी सलमानच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर शिंदे गटाचे युवासेना सचिव राहुल कनाल यांनीही सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीसाठी श्रीकांत शिंदेंची कल्याणमधील उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.  आधी भाजपा आणि आता शिंदे गटाच्या खासदाराने भाईजानची भेट घेतल्याने नेमकं चाललंय काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काही कलाकारांनाही राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तर अनेक कलाकार लोकसभा निवडणुकीच्या राजकीय पक्षांच्या प्रचारसभांमध्येही दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांकडून मतदारांना खेचून घेण्यासाठी सेलिब्रिटींना प्रचारसभांमध्ये उतरवलं जाणार असल्याचंही बोललं जात आहे.  कल्याणमधून

Web Title: after bjp aashish shelar shivsena mp shrikant shinde meets salman khan photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.