कौतुकास्पद! अभिनेता रवी किशन यांची मुलगी अभिनयाऐवजी होतेय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 10:40 AM2023-06-28T10:40:01+5:302023-06-28T10:40:20+5:30

Ravi Kishan : चित्रपटांमधून राजकारणात आलेले भाजप खासदार रवी किशन यांची कन्या इशिता शुक्ला अग्निपथ योजनेअंतर्गत संरक्षण दलात सामील होणार आहे. सोशल मीडियावर लोक रवी किशन आणि त्यांची मुलगी इशिता शुक्ला यांचे अभिनंदन होत आहे.

Admirable! Actor Ravi Kishan's daughter joins army instead of acting; Learn about her | कौतुकास्पद! अभिनेता रवी किशन यांची मुलगी अभिनयाऐवजी होतेय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

कौतुकास्पद! अभिनेता रवी किशन यांची मुलगी अभिनयाऐवजी होतेय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

googlenewsNext

कलाकार आणि त्यांची मुलं सातत्याने चर्चेत येत असते. बरेच स्टारकीड्स पालकांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेइंडस्ट्रीत आपले नशीब आजमावताना दिसत आहेत. तर काही स्टारकिड्स अभिनयऐवजी वेगळ्या क्षेत्रात करिअर करत आहेत. दरम्यान आता एका प्रसिद्ध अभिनेत्याची लेक भारतीय सैन्यात भरती होणार आहे. चित्रपटांमधून राजकारणात आलेले भाजप खासदार रवी किशन यांची कन्या इशिता शुक्ला अग्निपथ योजनेअंतर्गत संरक्षण दलात सामील होणार आहे. सोशल मीडियावर लोक रवी किशन आणि त्यांची मुलगी इशिता शुक्ला यांचे अभिनंदन होत आहे. 

रवी किशन यांची मुलगी इशिता केवळ २१ वर्षांची आहे. इशिताने सैन्यात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर्षी २६ जानेवारी रोजी तिने परेडमध्ये भाग घेतला होता. एनसीसीकडून परेडमध्ये सहभागी झालेल्या १४८ महिलांपैकी इशिता शुक्ला देखील एक होती. तेव्हा रवी किशन यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला होता. इशिताचे कौतुक करताना एक यूजर म्हणाला, 'आम्हाला तुम्हा दोघांचा अभिमान आहे. त्यांनी इतर नेत्यांसमोर आदर्श ठेवला आहे. रवी भाऊ, अभिनंदन. 

इशिताव्यतिरिक्त रवी किशन यांना आहेत आणखी ३ मुलं

रवी किशन यांनी ट्विटमध्ये लिहिले की, मला माझ्या मुलीचा अभिमान आहे, जिने प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. रवी किशन यांनी सांगितले होते की, इशिता दिल्ली डायरेक्टोरेटच्या ‘७ गर्ल बटालियन’ची कॅडेट आहे. इशिता शुक्ला व्यतिरिक्त रवी किशनला रिवा, तनिष्क आणि सक्षम अशी आणखी ३ मुले आहेत. यातील रिवाला तिच्या वडिलांप्रमाणे अभिनयात करिअर करायचे आहे. तिने चित्रपट निर्मिती आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. नृत्यात निपुण असलेल्या रिवाने अमेरिकेत अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. ती जवळपास वर्षभरापासून नसीरुद्दीन शाह यांच्या प्ले ग्रुपचा भाग आहे.

रवी किशन आहेत अनेक हिट प्रोजेक्ट्सचा भाग 
५३ वर्षीय रवी किशन हे त्यांच्या भोजपुरी गाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत, ज्यांचे हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये प्रचंड चाहते आहेत. त्यांनी 'फिर हेरा फेरी', 'वेलकम टू सज्जनपूर', 'मुक्काबाज', 'किक 2' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते अनेक हिट प्रोजेक्ट्सचे भाग आहेत. ते ओटीटीवरही काम करताना दिसले आहेत.

Web Title: Admirable! Actor Ravi Kishan's daughter joins army instead of acting; Learn about her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.