​या अभिनेत्रीसाठी संजय दत्त ऋषी कपूरला गेला होता मारायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 11:55 IST2017-06-06T06:16:21+5:302017-06-06T11:55:01+5:30

ऋषी कपूर आणि टिना मुनिम यांनी कर्ज, आप के दिवाने, बडे दिलवाला, दीदार-ए-यार यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ...

For this actress, Sanjay Dutt had gone to Rishi Kapoor | ​या अभिनेत्रीसाठी संजय दत्त ऋषी कपूरला गेला होता मारायला

​या अभिनेत्रीसाठी संजय दत्त ऋषी कपूरला गेला होता मारायला

ी कपूर आणि टिना मुनिम यांनी कर्ज, आप के दिवाने, बडे दिलवाला, दीदार-ए-यार यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. टिना मुनिम आणि ऋषी कपूर यांची केमिस्ट्री त्याकाळात प्रेक्षकांना खूप आवडत असे. पण टिना मुनिममुळे संजय दत्त ऋषी कपूर यांना मारायला गेला होता.
ऋषी कपूर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केला आहे. त्यांनी आत्मचरित्रात लिहिले आहे की, काही गैरसमज निर्माण झाल्यामुळे संजय दत्त आणि माझ्यात भांडणे झाली होती. त्या काळी संजय आणि टिना मुनिम यांच्यात अफेअर सुरू होते. पण टिनाचे माझ्याशी देखील अफेअर आहे असा संशय संजूला होता. संजूचे गुलशन ग्रोव्हरसोबतचे नाते खूपच चांगले होते. तो त्याला त्याच्या भावासारखा होता. संजूने एकदा गुलशनला सांगितले की, आपण चिंटू (ऋषी कपूर) ला मारण्यासाठी त्याच्या घरी जाऊया. माझ्यात आणि टिनामध्ये मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त आहे असे त्याला सतत वाटत असल्याने तो मला मारण्यासाठी माझ्या घरी आला होता. त्यावेळी संजू खूप ड्रग्स घ्यायचा. माझ्या घरी आला त्यावेळी देखील तो ड्रग्सच्या नशेतच होता. पण त्यावेळी नितू (नितू सिंग) घरात होती. नितू आणि माझे लग्न ठरले होते. तिने त्याला समजावून सांगितले की माझ्यात आणि टिनामध्ये अफेअर नसून आम्ही दोघे केवळ चांगले फ्रेंड्स आहोत. नितूमुळे त्याचा राग शांत झाला आणि तो माझ्या घरातून गेला. 
संजय दत्त आणि टिना मुनिम यांनी रॉकी या चित्रपटात एकत्र काम केले होते. संजय आणि टिना लहानपणापासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या आधीपासूनच या दोघांमध्ये अफेअर सुरू होते. पण संजय दारू आणि ड्रग्सच्या अधीन गेल्यामुळे टिनाने त्याच्यापासून दूर राहाण्याचे ठरवले.

Web Title: For this actress, Sanjay Dutt had gone to Rishi Kapoor