अभिनेत्री मौनी रॉयने पुन्हा केली प्लास्टिक सर्जरी? चेहरामोहरा बदलला! नेटकरी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 09:01 AM2024-06-02T09:01:13+5:302024-06-02T09:02:44+5:30

बॉलिवूडमधली सुप्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयने प्लास्टिक सर्जरी केल्याने तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

Actress Mouni Roy has undergone plastic surgery again zaalima song out | अभिनेत्री मौनी रॉयने पुन्हा केली प्लास्टिक सर्जरी? चेहरामोहरा बदलला! नेटकरी म्हणतात...

अभिनेत्री मौनी रॉयने पुन्हा केली प्लास्टिक सर्जरी? चेहरामोहरा बदलला! नेटकरी म्हणतात...

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय ही कायम चर्चेत असते. मौनीने रणबीर कपूरसोबत 'ब्रम्हास्त्र' सिनेमात साकारलेली खलनायिकेची भूमिका चांगलीच गाजली. याशिवाय टेलिव्हिजनवरील गाजलेल्या 'नागीन' या मालिकेत मौनीने भूमिका साकारून सर्वांचं लक्ष वेधलं. सध्या मौनीने तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा प्लास्टिक सर्जरी केल्याची चर्चा असल्याने ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलीय. 

मौनीचा केली प्लास्टिक सर्जरी?

झालं असं की.. मौनीने अरबी गायक डिस्टिंक्टसोबत एक नवीन म्युझिक व्हिडीओ रिलीज केलाय. 'जालिमा' असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं रिलीज होताच मौनीचा बदललेला लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला नाहीय. याशिवाय तिने चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केल्याची अफवाही समोर आलीय. मौनीचे डोळे आणि चेहरा काहीसा बदललेला दिसतोय. मौनीचा हा नवीन लूक नेटकऱ्यांच्या पचनी पडलेला दिसत नाही.

ट्रोलर्सनी साधला मौनीवर निशाणा

'जालिमा' गाण्याचा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी मौनीवर निशाणा साधलाय. पहिली गोष्ट म्हणजे, मौनीऐवजी नोरा फतेहीला या अरबी गाण्यात कास्ट केलं असतं तर पाहायला आवडलं असतं, अशी अपेक्षा नेटकऱ्यांनी केलीय. याशिवाय मौनीचा लूक पाहून तिला ट्रोल केलंय. "मौनीपेक्षा नोराला कास्ट करायला हवं होतं. चांगलं दिसलं  असतं", "मौनी खूप वाईट दिसत आहे.", "मौनीच्या डोळ्यांना काय झाले? तिनेही डोळ्यांवर प्लास्टिक सर्जरी केली आहे का?" आता मौनीने खरंच प्लास्टिक सर्जरी केलीय का, याचं उत्तर तिलाच ठाऊक!

 

Web Title: Actress Mouni Roy has undergone plastic surgery again zaalima song out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.