"मुलीच्या जन्मानंतर मला..."; कियारा अडवाणीने पहिल्यांदाच सांगितला आई झाल्यानंतरचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 10:49 IST2026-05-10T10:47:57+5:302026-05-10T10:49:06+5:30

अभिनेत्री कियारा अडवाणीने आई झाल्यानंतरच्या काळातील टप्प्याबद्दल प्रथमच मोकळेपणाने भाष्य केले आहे. या काळात तिच्यामध्ये झालेले भावनिक बदल आणि पती सिद्धार्थ मल्होत्राने दिलेली खंबीर साथ याबद्दल बोलताना कियारा भावुक झाली.

actress Kiara Advani shares her experience of becoming a mother for the first time | "मुलीच्या जन्मानंतर मला..."; कियारा अडवाणीने पहिल्यांदाच सांगितला आई झाल्यानंतरचा अनुभव

"मुलीच्या जन्मानंतर मला..."; कियारा अडवाणीने पहिल्यांदाच सांगितला आई झाल्यानंतरचा अनुभव

अभिनेत्री कियारा अडवाणीने आई झाल्यानंतरच्या काळातील, म्हणजेच 'पोस्टपार्टम' (बाळंतपणानंतरचा काळ) टप्प्याबद्दल प्रथमच मोकळेपणाने भाष्य केले आहे. या काळात तिच्यामध्ये झालेले भावनिक बदल आणि पती सिद्धार्थ मल्होत्राने दिलेली खंबीर साथ याबद्दल बोलताना कियारा भावुक झाली.

राज शमानीसोबत संवाद साधताना कियारा म्हणाली की, आपण कोणत्या भावनिक बदलांतून जात आहोत, हे समजायलाच तिला काही महिने लागले. ३४ वर्षीय कियाराच्या मते, बाळंतपणानंतरचे आयुष्य ही एक पूर्णपणे नवीन दुनिया आहे. ती म्हणाली, "नेहमी इतरांसाठी काम करताना आपण स्वतःसोबतचे नाते विसरून जातो. माझ्या मुलीच्या जन्मानंतर आलेल्या या बदलामुळे मला स्वतःसाठी वेळ मिळाला आणि स्वतःसोबतचे नाते सावरण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट ठरली."

कियाराने या कठीण काळात सिद्धार्थने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. ती म्हणाली की, सिद्धार्थ त्याच्या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये आणि कामात प्रचंड व्यस्त होता, तरीही त्याने तिच्यासाठी वेळ काढला. अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे कियाराच्या डोळ्यात पाणी येत असे, अशा वेळी सिद्धार्थने तिला सांभाळून घेतले. काम संपवून तो रात्री उशिरा कियाराच्या आईच्या घरी तिला भेटायला यायचा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तिला बरं वाटावं म्हणून तो तिला रात्रीच्या वेळी बाहेर फिरायलाही घेऊन जात असे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी फेब्रुवारी २०२३ मध्ये विवाहबंधनात अडकले आणि जुलै २०२५ मध्ये त्यांना 'सारायाह' (Sarayah) नावाची मुलगी झाली. आई झाल्यानंतरचा हा पहिलाच 'मदर्स डे' कियारासाठी अत्यंत खास आहे. कियारा अडवाणी लवकरच बहुप्रतिक्षित 'टॉक्सिक' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती सुपरस्टार यश, नयनतारा आणि तारा सुतारिया यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. आई झाल्यानंतरच्या जबाबदाऱ्या सांभाळून कियारा पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात सक्रिय होत आहे.

Web Title : कियारा आडवाणी ने बेटी के जन्म के बाद के अनुभव पर बात की

Web Summary : कियारा आडवाणी ने बेटी के जन्म के बाद के अपने अनुभवों और भावनात्मक बदलावों पर खुलकर बात की। उन्होंने अपने पति सिद्धार्थ मल्होत्रा ​​के अटूट समर्थन और इस दौरान खुद को फिर से खोजने के बारे में बताया। मातृत्व अपनाने के बाद कियारा फिल्म 'टॉक्सिक' में नजर आएंगी।

Web Title : Kiara Advani Opens Up About Postpartum Experience After Daughter's Birth

Web Summary : Kiara Advani candidly discussed her postpartum journey and emotional changes after her daughter's birth. She highlighted her husband Siddharth Malhotra's unwavering support and how she rediscovered herself during this phase. Kiara is set to appear in the film 'Toxic' after embracing motherhood.