अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस वेब सिरीजद्वारे डिजिटल पदार्पण करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 12:06 PM2023-11-20T12:06:47+5:302023-11-20T12:08:33+5:30

जॅकलिन फर्नांडिस वेब सिरीजद्वारे डिजिटल पदार्पण करणार आहे.

Actress Jacqueline Fernandez will make her digital debut with a web series | अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस वेब सिरीजद्वारे डिजिटल पदार्पण करणार

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस वेब सिरीजद्वारे डिजिटल पदार्पण करणार

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मुळची श्रीलंकन असलेल्या जॅकलिनने मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये जम बसवला.  आता जॅकलिन वेब सिरीजद्वारे डिजिटल पदार्पण करणार आहे.

दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांच्या वेब सीरिजमधून जॅकलीन डिजिटल जगात पाऊल ठेवणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या शोमध्ये जॅकलिनसोबत अभिनेता नील नितीन मुकेश महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ही सीरिज जिओ सिनेमावर पाहायला मिळणार असून  जीओएटी (ग्रेटेस्ट ऑफ आल टाइम) असे सीरिजचे नाव आहे. 


 प्रामुख्याने मुंबईतच या सीरिजचे शूटिंग होणार आहे. याशिवाय जॅकलिन 'फतेह', 'हाऊसफुल 5' आणि 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.जॅकलिन फर्नांडिसने २००९ साली अलादिन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 'राज ३', 'डॉन ३', 'ब्रदर्स', 'हाउसफूल', 'बच्चन पांडे',' ए फ्लाइंग जेट', 'ढिशूम' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांत जॅकलिन महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली आहे. 

Web Title: Actress Jacqueline Fernandez will make her digital debut with a web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.