मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत केलेलं लग्न, आता ४ वर्षांतच मोडला संसार; प्रसिद्ध अभिनेत्राचा घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:31 IST2026-03-11T16:29:41+5:302026-03-11T16:31:04+5:30

'मैत्रिणीचा संसार मोडणारी' अशा शब्दांत तिच्यावर अभिनेत्रीवर टीका झाली होती. मात्र आता अभिनेत्रीचा घटस्फोट झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत

actress hansika motwani divorces after 4 years of marriage actress married with best friend husband | मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत केलेलं लग्न, आता ४ वर्षांतच मोडला संसार; प्रसिद्ध अभिनेत्राचा घटस्फोट

मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत केलेलं लग्न, आता ४ वर्षांतच मोडला संसार; प्रसिद्ध अभिनेत्राचा घटस्फोट

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या खासगी आयुष्याबाबत एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून हंसिकाच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा होत्या, ज्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबईतील बांद्रा फॅमिली कोर्टाने हंसिका आणि तिचा पती सोहेल कथुरिया यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हंसिका मोटवानीने ४ डिसेंबर २०२२ रोजी व्यावसायिक सोहेल कथुरिया याच्याशी जयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. त्यांच्या या 'रॉयल वेडिंंग'ची सर्वत्र चर्चा झाली होती. मात्र, लग्नानंतर अवघ्या काही काळातच त्यांच्यात मतभेद सुरू झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या. गेल्या काही महिन्यांपासून हंसिका पती सोहेलपासून वेगळी राहत होती आणि तिने सोशल मीडियावरून तिच्या लग्नाचे फोटो - व्हिडिओही हटवले होते.

बांद्रा कोर्टाने दोघांची सहमती घेऊन त्यांनी दाखल केलेला घटस्फोटाच्या अर्जावर सुनावणी करत त्यांचा अंतिम निर्णय दिला आहे. असंही सांगण्यात येतंय की, हंसिकाने या घटस्फोटासाठी सोहेलकडून कोणतीही पोटगी (Alimony) किंवा आर्थिक मदतीची मागणी केलेली नाही. दोघांनीही सामंजस्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

मैत्रिणीच्या नवऱ्याशीच केलेलं लग्न

हंसिकाचा पती सोहेल कथुरियाचे हे दुसरे लग्न होते. विशेष म्हणजे, सोहेलची पहिली पत्नी रिंकी बजाज ही हंसिकाची जवळची मैत्रीण होती. जेव्हा हंसिकाने सोहेलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. 'मैत्रिणीचा संसार मोडणारी' अशा शब्दांत तिच्यावर टीका झाली होती. मात्र, हंसिकाने एका रिॲलिटी शोच्या माध्यमातून हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

लग्नानंतर अवघ्या चार वर्षांतच हा संसार मोडल्यामुळे हंसिकाचे चाहते थक्क झाले आहेत. सध्या हंसिका तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत असून, तिने चाहत्यांकडे या कठीण काळात तिच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती केली आहे.

Web Title : दोस्त के पूर्व पति से शादी के बाद हंसिका मोटवानी का तलाक; 4 साल में टूटा रिश्ता

Web Summary : हंसिका मोटवानी और सोहेल कथुरिया ने चार साल बाद तलाक ले लिया। हंसिका को अपनी दोस्त के पूर्व पति सोहेल से शादी करने पर आलोचना का सामना करना पड़ा। मतभेदों के कारण दोनों अलग हो गए। हंसिका ने गुजारा भत्ता नहीं मांगा और अपने करियर पर ध्यान केंद्रित कर रही हैं।

Web Title : Hansika Motwani Divorces After Marrying Friend's Ex-Husband; 4-Year Marriage Ends

Web Summary : Hansika Motwani and Sohael Kathuria are divorced after four years of marriage. Hansika faced backlash for marrying Sohael, her friend's ex. The couple separated due to disagreements. She didn't seek alimony and focuses on her career.