Amitabh Bachchan Hospitalised: अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल! समोर आली मोठी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 11:33 IST2026-05-20T11:27:39+5:302026-05-20T11:33:04+5:30
अमिताभ यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात होते. अखेर त्यामागचं खरं कारण समोर आलंय

Amitabh Bachchan Hospitalised: अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल! समोर आली मोठी माहिती
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मंगळवारी संध्याकाळी अचानक रुग्णालयात दाखल झाल्याची अफवा पसरली होती. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र, मंगळवारी उशिरा रात्री बिग बींनी सोशल मीडिया आणि ब्लॉगवर एक खास पोस्ट शेअर करत आपण पूर्णपणे ठणठणीत असल्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रुग्णालयात दाखल झाल्याची काय होती अफवा?
एका युट्युब चॅनलवर असा दावा करण्यात आला होता की, अमिताभ बच्चन यांना १६ मे रोजी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच मंगळवारी संध्याकाळी अभिषेक बच्चनही त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचला होता. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन केवळ त्यांच्या नियमित वैद्यकीय तपासणीसाठी (Routine Check-up) रुग्णालयात गेले होते आणि तपासणीनंतर ते लगेच घरी परतले. त्यामुळे काळजी करण्यासारखे कोणतेही कारण नसून त्यांची प्रकृती उत्तम आहे.
घरी परतल्यावर बिग बींचे खास ट्विट आणि कविता
घरी परतल्यानंतर बिग बींनी मंगळवारी मध्यरात्री १२ वाजता त्यांच्या अधिकृत ब्लॉगवर एक मजेशीर कविता पोस्ट केली. त्यांनी लिहिले: "चील जब होवे शांत तो भैया, तोते बोलन सुरु करें..." या कवितेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या प्रकृतीबाबत अफवा पसरवणाऱ्यांना आपल्याच खास शैलीत चोख उत्तर दिले आहे.
८३ व्या वर्षीही महानायक आहेत सुपर ॲक्टिव्ह
अमिताभ बच्चन यांचे वय ८३ वर्षे असूनही ते आजही मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. 'कौन बनेगा करोडपती' (KBC) च्या सीजनचे शूटिंग संपवून ते सध्या घरी विश्रांती घेत आहेत. अमिताभ बच्चन शेवटचे २०२४ मध्ये रजनीकांत यांच्या 'वेट्टैयन' आणि नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्कि २८९८ एडी' (Kalki 2898 AD) या चित्रपटात दिसले होते. 'कल्की'मधील त्यांच्या 'अश्वत्थामा'च्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. नुकतेच त्यांनी हैदराबाद येथे दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांच्यासोबत या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग पूर्ण केले आहे.