इरफानच्या अनुसार दीपिका सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 17:32 IST2016-06-11T12:02:50+5:302016-06-11T17:32:50+5:30

अभिनेता इरफान खानने दीपिका पदुकोन ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असल्याचे म्हटले आहे. अमिताभ बच्चन यांचेही असेच मत असल्याचा मला आनंद ...

According to Irrfan, Deepika is the best actress | इरफानच्या अनुसार दीपिका सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

इरफानच्या अनुसार दीपिका सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

िनेता इरफान खानने दीपिका पदुकोन ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असल्याचे म्हटले आहे. अमिताभ बच्चन यांचेही असेच मत असल्याचा मला आनंद वाटतो, असेही तो म्हणाला.
पिकु हा चित्रपट दीपिका पदुकोनमुळे लोकांनी पाहिला, असे अमिताभ बच्चन यांनी नुकतेच म्हटले होते.
याबाबत इरफानला विचारले असता तो म्हणाला, ‘मी याविषयी बोलणार नाही. जर ते असे म्हणत असतील, तर यात सत्य नक्कीच असेल. दीपिका ही सर्वोत्तम अभिनेत्री आहे. सर्व अभिनेत्रींमध्ये ती हिरा आहे. तिच्या कामाचे कौतुक होते, याचा मला आनंद आहे.’
सध्या इरफान हा मदारी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याच्या अनुसार व्यावसायिक चित्रपटाची व्याख्या आता विस्तारायला हवी.

Web Title: According to Irrfan, Deepika is the best actress