जायरा वसीमच्या समर्थनार्थ आमिर खानचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2017 16:53 IST2017-01-17T16:53:41+5:302017-01-17T16:53:41+5:30

दंगलमधील छोटी गीता फोगाट अर्थात जायरा वसीमच्या समर्थनार्थ बॉलिवूडमधील अनेक कलाकार पुढे येत असून, आमिर खाननेही ट्विट करुन तिचे ...

Aamir Khan's tweet to support Zaire | जायरा वसीमच्या समर्थनार्थ आमिर खानचे ट्विट

जायरा वसीमच्या समर्थनार्थ आमिर खानचे ट्विट

गलमधील छोटी गीता फोगाट अर्थात जायरा वसीमच्या समर्थनार्थ बॉलिवूडमधील अनेक कलाकार पुढे येत असून, आमिर खाननेही ट्विट करुन तिचे समर्थन केले आहे. जायरा केवळ १६ वर्षांची असून, आपण तिच्यावर दबाव आणता कामा नये, असे आमिरने लिहिले आहे.
‘मी जायराचे स्टेटमेंट वाचले आहे. तिने कोणत्या परिस्थितीत हे लिहिले असावे आणि नंतर ते डिलीट केले असावे याची कल्पना येते. जायरा, मी तूला सांगू इच्छितो की, आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत. तुझ्यासारख्या बुद्धिमान, युवा, प्रतिभाशाली, मेहनती आणि दुसºयांचा सन्मान ठेवणारी मुलगी केवळ भारताचे नव्हे, तर जगाचे रोल मॉडेल आहेस. तू माझीही रोल मॉडेल आहेस.’

{{{{twitter_post_id####}}}}


आमिर पुढे म्हणाला, ‘मी सर्वांना विनंती करतो, त्यांनी जायराला मोकळे सोडावे. आपण या गोष्टीचे भान राखले पाहिजे, ती केवळ १६ वर्षे वयाची आहे आणि आपल्या इच्छेनुसार जीवन जगू इच्छिते.
दंगलमध्ये भूमिका साकारलेली जायरा वसीम ही जम्मू-काश्मीर येथील असून, तिने नुकत्याच घोषित झालेल्या दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळविले आहेत. जायराच्या या कामगिरीमुळे जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तिची भेट घेऊन कौतुक केले होते. काश्मिरमधील मुलांची ती रोल मॉडेल असल्याचेही मेहबूबा यांनी सांगितले. यानंतर तिच्या वक्तव्याबद्दल तिच्यावर टीका होऊ लागली.








Web Title: Aamir Khan's tweet to support Zaire