"सरस्वतीची पूजा करा, लक्ष्मी स्वतःहून येईल"; आमिर खान नेमकं काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 14:45 IST2026-05-04T14:44:39+5:302026-05-04T14:45:05+5:30
बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमिर खान कायम चर्चेत असतो.

"सरस्वतीची पूजा करा, लक्ष्मी स्वतःहून येईल"; आमिर खान नेमकं काय म्हणाला?
बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमिर खान कायम चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने चित्रपटांकडे पाहण्याचा एक आध्यात्मिक आणि व्यावसायिक दृष्टिकोन मांडला आहे. 'सिनेमा हे सर्जनशील क्षेत्र आहे, तिथे पैशांच्या मागे धावण्यापेक्षा कलेची साधना करणे महत्त्वाचे आहे' असे आमिरने म्हटले.
अलीकडेच एका मुलाखतीमध्ये आमिरने आपल्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत खुलासा केला. 'एक दिन' आणि 'लाहौर १९४७' या प्रोडक्शन प्रोजेक्ट्सनंतर तो पुन्हा अभिनयावर लक्ष केंद्रित करणार आहे. विशेष म्हणजे, आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच तो एकाच वेळी तीन चित्रपटांवर काम करण्याची तयारी करत आहे. सप्टेंबरपासून शूटिंग सुरू करण्याचा त्याचा विचार असून, प्रत्येक प्रोजेक्टदरम्यान एक ते दोन महिन्यांचा ब्रेकही असणार आहे.
आमिरने सिनेमाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, "सिनेमा हा क्रिएटिव्ह क्षेत्र आहे. इथे देवी सरस्वतीची पूजा करायला हवी, लक्ष्मीची नाही. जर तुम्ही कलेवर लक्ष केंद्रित केलं, तर पैसा आपोआप येतो". त्याने 'लगान'सारखा चित्रपट पैसे कमावण्यासाठी नव्हे, तर कथेतल्या विश्वासामुळे केल्याचंही नमूद केलं. तसेच, आता तो प्रेक्षकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन निर्णय घेत असल्याचंही त्याने सांगितलं.