"तो लंबी रेस का घोडा...", आमिरने केलं लेक जुनैद खानचं कौतुक, स्वत:शीच केली तुलना
By कोमल खांबे | Updated: April 29, 2026 10:58 IST2026-04-29T10:58:19+5:302026-04-29T10:58:49+5:30
'एक दिन'च्या स्पेशल इव्हेंटमध्ये लेकाचा अभिनय पाहून आमिरला अश्रू अनावर झाले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता आमिरने त्याच्या लेकाचं कौतुक केलं आहे. आमिरने जुनैदची तुलना स्वत:शीच करत "तो लंबी रेस का घोडा" असल्याचं म्हटलं आहे.

"तो लंबी रेस का घोडा...", आमिरने केलं लेक जुनैद खानचं कौतुक, स्वत:शीच केली तुलना
आमिर खानचा लेक जुनैद खान त्याच्या आगामी 'एक दिन' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात जुनैद खानसोबत साऊथ स्टार साई पल्लवीही मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाची निर्मिती आमिर खान प्रोडक्शनने केली आहे. 'एक दिन'च्या स्पेशल इव्हेंटमध्ये लेकाचा अभिनय पाहून आमिरला अश्रू अनावर झाले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता आमिरने त्याच्या लेकाचं कौतुक केलं आहे. आमिरने जुनैदची तुलना स्वत:शीच करत "तो लंबी रेस का घोडा" असल्याचं म्हटलं आहे.
'एक दिन'च्या निमित्ताने आमिरने रेडिओ सिटी इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने जुनैदचं कौतुक केलं. तो म्हणाला, "जुनैद खूपच स्वतंत्र मुलगा आहे. तो कोणावरुन अवलंबून नाही. तो मला कधीच काही करू देणार नाही. तो लवकर हार मानत नाही. तो लंबी रेस का घोडा आहे. मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलो होतो तेव्हा माझ्याबद्दल देखील असंच बोललं जायचं. एक दिन सिनेमात त्याच्या भूमिकेसाठी त्याने प्रामाणिकपणे काम केलं आहे. सिनेमातील हे कॅरेक्टर हिरोसारखं नाही. पण तरीही त्याने अत्यंत प्रामाणिकपणे ती भूमिका साकारली आहे".
'एक दिन' हा एक रोमँटिक सिनेमा आहे. या सिनेमात साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमातून साई पल्लवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. १ मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असून सुनिल पांडे यांचं दिग्दर्शन आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वन डे' या सिनेमाचा हा रिमेक आहे.