प्रियंकाचे यशस्वी होण्याचे 4 मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 18:16 IST2016-06-24T12:46:31+5:302016-06-24T18:16:31+5:30

ब्युटी क्विन, बॉलीवूड स्टार, आंतरराष्टÑीय गायिका आणि आता हॉलीवूड स्टार. प्रियंका चोप्राने हे यश केवळ एकाच दिवसात मिळविलेले नाही. ...

4 ways to succeed Priyanka | प्रियंकाचे यशस्वी होण्याचे 4 मार्ग

प्रियंकाचे यशस्वी होण्याचे 4 मार्ग

युटी क्विन, बॉलीवूड स्टार, आंतरराष्टÑीय गायिका आणि आता हॉलीवूड स्टार. प्रियंका चोप्राने हे यश केवळ एकाच दिवसात मिळविलेले नाही. ३३ वर्षीय प्रियंकाने २०१२ साली इन माय सिटीपासून पाश्चिमात्य देशांमध्ये सुरुवात केली. आता अमेरिकन टी. व्ही. मालिका क्वाँटिकोमध्ये तिची प्रमुख भूमिका आहे.
बेवॉच या हॉलीवूड पटानंतर प्रियंकाने माघारी वळून पाहिलेले नाही. हे यश आणि प्रसिद्धी मिळविण्यामागचे मार्ग प्रियंकाने आयफा अ‍ॅवार्डस्दरम्यान सांगितले.
तुम्ही जे आहात, तेच खरे असल्याचा माझा विश्वास आहे.
यश मिळेलच याची खात्री मी बाळगत नाही. कोणीही बाळगू नये.
काही क्षणानंतर हे संपणार आहे. माझ्यासोबतही असेच घडेल याची मला खात्री आहे.
परंतू मी काही तरी यश मिळविले आहे. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीत सहभागी होऊ शकता.
युवा पिढीने केवळ एकाच गोष्टीपुरते आपले जग मर्यादित ठेवू नये. मी एकच गोष्ट करीन असे कधीही म्हणता कामा नये. आम्ही आशा काळात जगत आहोत, ज्या काळात आणि  तुम्हाला सर्व गोष्टी येऊ शकतात आणि कोणत्याही वयात. कोणत्याही शक्यतांना तुम्ही नाकारु नका. तुम्ही नेहमी खुल्या विचारांचे असले पाहिजे, असे प्रियंकाने सांगितले.

Web Title: 4 ways to succeed Priyanka