"कोणत्याही गोष्टीचा संदर्भ....", पती जॅकी भगनानीच्या 'सिच्युएशनशिप'च्या वक्तव्यानंतर रकुल प्रीत सिंगने दिलं स्पष्टीकरण, ट्रोल करणाऱ्यांना धरलं धारेवर, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 11:35 IST2026-04-25T11:32:55+5:302026-04-25T11:35:23+5:30

पती जॅकी भगनानीच्या 'सिच्युएशनशिप'च्या 'त्या' वक्तव्यावर रकुल प्रीत सिंगने दिली प्रतिक्रिया, ट्रोल करणाऱ्यांनाही धरलं धारेवर

bollywood actress rakul preet singh breaks silence on husband jackky bhagnani situationship remark on marriage she said | "कोणत्याही गोष्टीचा संदर्भ....", पती जॅकी भगनानीच्या 'सिच्युएशनशिप'च्या वक्तव्यानंतर रकुल प्रीत सिंगने दिलं स्पष्टीकरण, ट्रोल करणाऱ्यांना धरलं धारेवर, म्हणाली...

"कोणत्याही गोष्टीचा संदर्भ....", पती जॅकी भगनानीच्या 'सिच्युएशनशिप'च्या वक्तव्यानंतर रकुल प्रीत सिंगने दिलं स्पष्टीकरण, ट्रोल करणाऱ्यांना धरलं धारेवर, म्हणाली...

Rakul Preet Singh: कलाकार म्हटलं की कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.अशातच एका लोकप्रिय जोडीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. २१ फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. रकुल आणि जॅकी यांच्या लग्नात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. दरम्यान या जोडीच्या लग्नाला आता दोन वर्ष पुर्ण झाली आहेत. अशातच या जोडीने एका मुलाखतीत रिलेशिपबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेचा विषय बनले. आता या संपूर्ण प्रकरणावर  रकुल प्रीत सिंगने प्रतिक्रिया दिली आहे.

अलिकडेच एका मुलाखतीमध्ये जॅकी भगनानीनं आपल्या नात्याबद्दल मनमोकळेपणानं भाष्य केलं. त्यानं सांगितलं की, विवाहित असूनही, तो त्यांच्या नात्याकडे एक प्रकारची 'सिच्युएशनशिप' म्हणून पाहतो. अभिनेत्याच्या त्या वक्तव्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. शिवाय यामुळे त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. आता नवऱ्यासाठी रकुल पुढे सरसावली आहे आणि या प्रकरणी मौन सोडलं आहे.


 
ट्रोल करणाऱ्यांना रकुलचं सडेतोड उत्तर

दरम्यान, जॅकीच्या वक्तव्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना रकुलने धारेवर धरंल आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक लक्षवेधी पोस्ट शेअर करत तिने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.या पोस्टमध्ये तिने म्हटलंय, "गंमत तिथपर्यंतच ठीक असते जिथे ती कोणाला त्रास देत नाही. एका तासाभराच्या संवादातील केवळ एक ओळ उचलून हेडलाईन बनवणं चुकीचं आहे. कोणत्याही गोष्टीचा संदर्भ आणि त्यातील बारकावे समजून घेणं गरजेचं असतं. एका सुंदर संवादाचा असा क्लिकबेट म्हणून वापर करणं थांबवलं पाहिजे. कंटेंट निर्माण करताना प्लॅटफॉर्म्सनी थोडी जबाबदारी दाखवण्याची वेळ आता आली आहे."

दरम्यान, रकुल आणि जॅकीने तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २१ फेब्रुवारी २०२४ रोजी गोव्यात धूमधडाक्यात लग्न केलं होतं. शीख धर्मातील आनंद कारज आणि सिंधू पद्धतीनुसार अशा दोन रितीरिवाजांनी हा विवाह सोहळा पार पडला होता. त्यांच्या या लग्नाची इडंस्ट्रीच खूप चर्चा झाली होती. 

Web Title : पति के 'सिचुएशनशिप' कमेंट पर रकुल प्रीत सिंह ने ट्रोलर्स को फटकारा।

Web Summary : रकुल प्रीत सिंह ने पति जैकी भगनानी की शादी पर 'सिचुएशनशिप' टिप्पणी के बाद ट्रोलिंग पर प्रतिक्रिया दी। उन्होंने मीडिया पर एक घंटे के इंटरव्यू से एक पंक्ति को सनसनीखेज बनाने की आलोचना की और जिम्मेदार सामग्री निर्माण का आग्रह किया।

Web Title : Rakul Preet Singh slams trolls after husband's 'situationship' comment.

Web Summary : Rakul Preet Singh responded to the trolling her husband, Jackky Bhagnani, faced after his 'situationship' comment about their marriage. She criticized the media for sensationalizing a single line from an hour-long interview, urging responsible content creation.