BANKCHOR First Look : रितेश देशमुखला बाबाच्या अवतारात बघून व्हाल लोटपोट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 18:17 IST2017-03-31T12:45:10+5:302017-03-31T18:17:48+5:30

BANKCHOR First Look: Riteish Deshmukh will be seen in the absence of Baba Lotto! | BANKCHOR First Look : रितेश देशमुखला बाबाच्या अवतारात बघून व्हाल लोटपोट!

BANKCHOR First Look : रितेश देशमुखला बाबाच्या अवतारात बघून व्हाल लोटपोट!

गेल्या कित्येक दिवसांपासून अडथळ्यांचा सामना करीत असलेल्या यशराज बॅनरनिर्मित ‘बॅँकचोर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक अखेर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असून, तो एका साधू बाबाची भूमिका साकारत आहे. मध्यंतरी अशी चर्चा पसरली होती की, कपिल शर्मा याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असून, त्याला यासाठी साइनदेखील करण्यात आले. परंतु रिलीज झालेल्या फर्स्ट लुकमध्ये रितेश झळकल्याने या चर्चांना आता पूर्णविराम बसला आहे. 

‘बॅँकचोर’चे मोशन पोस्टर रिलीज करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गणपती बाप्पा मोरया लेट्स रॉक!’ यशराज बॅनरअंतर्गत बनविण्यात आलेला हा रितेशचा पहिलाच चित्रपट आहे. या व्हिडिओमध्ये तीन लोक दिसत आहेत. एक व्यक्तीने हत्तीचा मुखवटा घातलेला आहे, दुसºयाने घोड्याचा, तर रितेश एका बाबाच्या रूपात दिसत आहे. जेव्हा या चित्रपटाच्या मेल लीडची घोषणा केली होती तेव्हा रितेशने म्हटले होते की, मला या चित्रपटाची स्क्रिप्ट खूपच आवडली आहे. शिवाय माझी भूमिका आणि टीमही माझ्या पसंतीची असल्याने काम करण्यास मजा येईल. 

Ganpati Bappa Morya let's rock! First ever feature film to release in 16D #BankChorOn16Junepic.twitter.com/Tks6HphdJ4

— Y Films (@Y_films) March 31, 2017}}}} ">http://}}}} ">Ganpati Bappa Morya let's rock! First ever feature film to release in 16D #BankChorOn16Junepic.twitter.com/Tks6HphdJ4

— Y Films (@Y_films) March 31, 2017
जर या बॅनरअंतर्गत कपिलने डेब्यू केला असता तर त्याच्या करिअरला जबरदस्त किक मिळाली असती यात शंका नाही. कपिलने तर त्याच्या शोमध्ये यशराज बॅनरच्या चित्रपटात काम करणार असल्याचा वारंवार उल्लेखही केला होता. ऐवढेच नव्हे तर यशराज फिल्मस्च्या अधिकृत सूत्रांनी कपिलच्या भूमिकेबाबतची घोषणाही केली होती. मात्र मध्यंतरीच्या काळात घडलेल्या घटनांमुळे कपिलचा यातून पत्ता कट करण्यात आला. अशी चर्चा होती की, कपिलला स्क्रिप्ट्समध्ये बरेचसे बदल हवे होते, त्यामुळेच त्याची या प्रोजेक्टमधून हकालपट्टी करण्यात आली. असो आता रितेश या चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याने कॉमेडीचा जबरदस्त डोस पाजला जाईल यात दुमत नाही. 

Web Title: BANKCHOR First Look: Riteish Deshmukh will be seen in the absence of Baba Lotto!