शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही लिपस्टिक कोणत्या रंगाची लावता? तुमची लिपस्टिक तुमच्याबद्दल खूप काही सांगते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 19:03 IST

आपल्याबद्दल आपण तोंडानंच काही सांगायला हवं असं नाही. खरंतर आपली लिपस्टिकही आपण स्वभावानं कशा आहोत? आपल्याला काय आवडतं? काय भावतं? हे इतरांना सांगत असते.

ठळक मुद्दे* तुमचा आवडीचा रंग जर लाल असेल आणि विशेष म्हणजे तुम्ही प्रेफरेबली लाल लिपस्टिकच वापरत असाल तर याचा अर्थ तुम्हाला सत्ता आणि स्त्रीत्व दोन्हीही प्यारं आहे असा होतो.* ब्राऊन आणि न्यूड कलर्सच्या लिपस्टिक्स लावणार्याना प्रत्येकानं आदरानं वागावं असं वाटतं.* जांभळी, हिरवी किंवा काळी लिपस्टिक लावणार्याना कधी चारचौघींसारखं दिसायला आवडतच नाही.

- मोहिनी घारपुरे- देशमुखबायकांच्या मेकअप किटमध्ये कितीही रंगांच्या लिपस्टिक्स खच्चून भरलेल्या असतील तरीही त्यापैकी एक विशिष्ट रंगाची लिपस्टिकच त्या नेहमी वापरतात असं बारकाईनं पाहिलं तर लक्षात येईल. हीच लिपस्टिक किंवा तोच रंग त्यांचा सिग्नेचर कलर वा लिपस्टिक म्हणून ओळखला जाऊ शकतो. या रंगांच्या निवडीमध्ये व्यक्तिमत्त्वाची अनेक गुपितं दडलेली असतात.

 

लालचुटूक लिपस्टिक

तुमचा आवडीचा रंग जर लाल असेल आणि विशेष म्हणजे तुम्ही प्रेफरेबली लाल लिपस्टिकच वापरत असाल तर याचा अर्थ तुम्हाला सत्ता आणि स्त्रीत्व दोन्हीही प्यारं आहे असा होतो. भरपूर आत्मविश्वास,भावनिकता आणि मादकता असं सारं काही तुम्ही या रंगाच्या लिपस्टिक वापरून प्रतीत करता.ब्राऊन आणि न्यूड कलर्सच्या लिपस्टिक्स

तुम्ही एक फॅशनेबल स्त्री असून तुमच्याशी प्रत्येकानं आदरानं वागावं असं वाटतं. या रंगांच्या लिपस्टिक्स हेच प्रतीत करतात. त्याचबरोबर तुमचे कपडेही फॅशनेबल तरीही ज्यात तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल असेच असतात. व्यक्ती म्हणून तुम्ही काहीशा इतरांवर अवलंबून असणार्या  आणि खूप काळजी घेणार्या असतात.गडद गुलाबी

तुम्ही अत्यंत बोलक्या, मनमोकळ्या स्वभावाच्या असता. जर लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात असं तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही त्यांचं लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करता. तुम्हाला मजा करायला आवडते तसंच अगदी फ्लर्टींग करणंही तुम्ही एन्जॉय करता. बोल्ड आणि ट्रेण्डी असलेल्या तुम्ही नेहमी काहीतरी अ‍ॅडव्हेंचरस करायला तयार असता.

 

 

जांभळी, हिरवी किंवा काळी लिपस्टिक

तुम्हाला चारचौघींसारखं दिसायला अजिबात आवडत नाही. किंबहुना जन्मत:च चारचौघींपेक्षा तुम्ही वेगळ्या असता. अत्यंत कल्पक असलेल्या तुम्ही तुमच्या लिपस्टिकच्या रंगांच्या निवडीवरून वेगळेपण दाखवता. तुमची सौंदर्यदृष्टी आणि सौंदर्याच्या कल्पना या भन्नाट असतात, कल्पनातीत असतात. किंबहुना तुम्ही सौंदर्याबाबत वेगळ्यापद्धतीनं विचार करू शकता.केशरी आणि कोरल्स

अत्यंत उमद्या स्वभावाच्या तुम्हाला कोणत्याही नकारात्मक भावना अजिबात आवडत नाहीत. तुम्हाला नेहमी मनापासून खूश, आनंदी राहायला आवडतं. तुम्हाला भरपूर भटकायला आवडतं. विशेषत: समुद्रकिनारी फिरायला आवडतं. आणि तुम्ही आयुष्यावर भरभरून प्रेम करता. 

लालभडक आणि वाईन कलर्स

अत्यंत मादकता हेच तुमचं व्यक्तिमत्व विशेष असल्याचं ही लिपस्टिक सांगते. नजाकत, शुद्धता, सौंदर्य या सगळ्याचं समीकरण असलेलं तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या आयुष्यात अनेक चढउतार आल्याचंही सांगतं.