शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

यंदाचे बजेट ‘थोडी खूशी, थोडा गम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 04:34 IST

 रेल्वे बजेटप्रमाणेच अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही काही नव्या घोषणा केल्या नाही. मात्र कृषी क्षेत्राला त्यांनी झुकते माप दिले.

2016-17 सालचा देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 29 फेब्रुवारीला लोकसभेत सादर केला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे बजेट सादर केल्यावर देशाचा अर्थसंकल्प कसा असेल याचा अंदाज देशातील अर्थतज्ज्ञ लावत होते. रेल्वे बजेटप्रमाणेच अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही काही नव्या घोषणा केल्या नाही. मात्र कृषी क्षेत्राला त्यांनी झुकते माप दिले. देशाला नव्या दिशेने न्यायचे असेल तर कृषी क्षेत्राचा विचार करावाच लागेल असे मत त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणांतून व्यक्त केले. सीएनएक्सने अर्थसंकल्पावर तरुणाईचे मत जाणून घेतले तेव्हा त्यांनी यंदाचे बजेट ‘थोडी खूशी, थोडा गम’देणारे आहे, असे सांगितले.विकासाच्या प्रगतीपथावर नेणारा चांगला अर्थसंकल्प असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले तर विरोधी पक्षाने यात काही खास नसल्याचे सांगितले आहे. मात्र हा अर्थसंकल्प बरा असल्याचे मत देशातील अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र मध्यमवर्गाला दिलास देण्याचे त्यांचे धोरण यातून दिसले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यावर विमान प्रवास, सिनेमाची तिकिटे, मोबाईल बिले, चपला-बूट, केबल सेवा महागली आहे. शिवाय दहा लाखांवरील गाड्या महाग होतील. सेवा कर वाढवून सामान्यांना मिळणाºया सेवाही महाग केल्या आहेत. म्हणजे सामान्य भारतीय नागरिक भूक भागवण्यासाठी आता हॉटेलात गेले तर त्यांना अधिक पैसे मोजावे लागतील.चित्रपट पाहायला गेले तर तेथेही खिसा हलका होईल. म्हणजे मनोरंजनही महाग केले आहे.  भारतात 70 टक्के लोकांची उपजीविका आजही शेतीवर चालते. मात्र कुटुंब शेतीवर पोसले जाऊ शकत नाही. मुळात शेतीत खासगी गुंतवणूक येत नाही. तशी ती यावी, यासाठी काही उपाय असतील, असे वाटत होते. परंतु तेथेही निराशाच पदरी आली आहे. महागाई आणखी वाढू शकतेअर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पातून जी सर्वांत महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे डिझेलवर अडीच टक्के अधिभार लावण्याची. मात्र यामुळे सामान्यांना दिलासा मिळेल, असे होणार नाही. कारण डिझेलच्या किमती वाढल्या तर वस्तूंच्या किमती वाढतील. म्हणजे महागाई वाढणार. याचा बोझा सर्वसामान्यांवरच बसणार आहे. म्हणजे महागाई नियंत्रणावर सरकारचा भर दिसत नाही. - सुहास माहुरकरग्रामीणांचा केवळ विचारच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील शेतकºयांचा विचार केला गेला आहे. मात्र विशेष अशा काही घोषणा त्यांनी केल्या नाहीत. आम्ही अर्थशास्त्राचे जाणकार नसलो तरी देखील पैसा कुठे खर्च केला पाहिजे याची जाणीव असल्याने या अर्थसंकल्पात काहीच नसल्याचे दिसते. ग्रामीण भागाचा विकास करण्याचे विचार मांडताना केवळ रस्त्यांचा उल्लेख केला आहे. - दीक्षा वासनिकबजेटनंतरच डिझेलचे रेट कसे वाढले?अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पानंतर डिझेल महागले आहे. याचा परिणाम सरळ वस्तूंच्या किमतीवर पडतो. मोठे वाहतूकदार डिझेलवर चालणाºया गाड्यांचा वापर क रतात. यामुळे मालभाडे वाढेल, मालभाडे वाढले की त्याचा परिणाम सरळ किमतीवर पडतो. म्हणजेच महागाई वाढेल. सरकारने सर्वसामन्याचा विचार करणे बंद केले की काय असेच वाटायला लागले आहे. - प्रणय चामट ग्रामीण विकासावर भर नरेंद्र मोदी यांचे सरकार विकासाच्या मुद्दयाला धरून आहे. विकास करताना लागणाºया काही गोष्टी त्यांनी अर्थसंकल्पातून दर्शविल्या आहेत. यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कर वाढ केलेली नाही. श्रीमंताकडून जादा कर व ग्रामीण विकासावर भर दिला आहे. घरांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगल्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. एकूणच विकासाच्या चांगल्या घोषणा करण्यात आल्या आहेत. - भाग्यश्री इखानेकाळा पैसा कसा परत येणार?नरेंद्र मोदी यांनी देशातील काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते काही पूर्ण होताना दिसत नाही. काळा पैसा ज्यांच्याकडे आहे त्यांनी आपली संपत्ती जाहीर करावी असेच अर्थमंत्री म्हणाले. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याची हिमंत त्यांनी दाखविली नाही. शिवाय जे लोक काळा पैसा जाहीर करतील त्यांना काही सूट दिली जाणार का, हेही सरकारने स्पष्ट करायला हवे. - मनोज लामखेडेशेअर बाजारात तेजीअर्थसंकल्पातील गोष्टींबाबत आम्हाला फारशी माहिती नसली तरी देखील चांगल्या गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. नवे उद्योग सुरू करणाºयांना कमी कर द्यावा लागेल. मेक इन इंडियाचे स्वप्न पाहण्यासाठी हे करणे फारच गरजेचे आहे. शिवाय उद्योग जगतासाठी चांगल्या बाबी यात असतीलच कारण अर्थसंकल्पानंतर दुसºया दिवशीच शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली हे चांगले झाले. - मयुरी शेंडे