शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
3
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
4
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
5
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
6
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
7
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
8
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
9
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
10
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
11
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
12
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
13
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
14
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
15
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
16
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
17
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
18
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
19
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
20
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप

यांनी घडविले शून्यातून विश्‍व..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:13 IST

ते श्रीमंत आहेत आणि विख्यातही आहेत. ते अशा पद्धतीने जीवन जगतात की आपणासही हेवा वाटेल.

ते श्रीमंत आहेत आणि विख्यातही आहेत. ते अशा पद्धतीने जीवन जगतात की आपणासही हेवा वाटेल. मात्र प्रत्येक जण चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेला नसतो. त्यांची पार्श्‍वभूमीही खूपशी चांगली नाही. त्यांच्या पाठीशी राजकीय शक्ती नाही, ज्यांच्या शिडीचा आधार घेऊन ते वर चढू शकतील. अशाच काही श्रीमंतांचा आढावा या ठिकाणी घेत आहोत. ही त्यांच्या यशाची गाथा आहे. यापासून नक्कीच प्रेरणा मिळू शकेल. पाँटी चढ्ढारस्त्याच्या कडेला स्नॅक्स विकण्यापासून सुरुवात केलेल्या आणि सुमारे ८000 कोटींच्या संपत्तीचे साम्राज्य उभ्या करणार्‍या गुरुदीप सिंग चढ्ढा उर्फ पाँटी चढ्ढा यांची कथा खूपच सुरस आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे जन्मलेले पाँटी हे दारुच्या दुकानासमोर उभे राहून स्नॅक्स विकत होते. नियोजनबद्ध व्यवसायाने लवकरच ते उत्तर प्रदेशातील मद्य व्यवसायात अग्रगण्य झाले. त्यानंतर त्यांनी रिअल इस्टेट, साखर, चित्रपट निर्मिती आणि विक्रीमध्ये आपले पाय पसरले. सप्टेंबर २0१२ साली झालेल्या हॉकी इंडिया लीगमध्ये त्यांच्या वेव्ह ग्रुपने दिल्लीचा संघ विकत घेतला. आपल्या भावांसोबत त्यांनी चढ्ढा ग्रुपची स्थापना केली. वेव्ह ब्रँडच्या नावाखाली त्यांनी आपले पंख पसरले. राष्ट्रीय राजधानीमध्ये मल्टीप्लेक्सची साखळी निर्माण केली. २0१२ साली त्यांचे निधन झाले, त्यावेळी त्यांची संपत्ती १0,000 कोटी इतकी होती.डॉ. सुभाष चंद्राडॉ. सुभाष चंद्रा यांना भारतीय माध्यमांचे बादशहा, व्यावसायिक, टेलिव्हिजन पर्सनॅलिटी, प्रेरक वक्ता आणि परोपकारी व्यक्ती म्हणून ओळखले जाते. भारतामधील सर्वात मोठय़ा झी मीडिया या टी. व्ही. चॅनल नेटवर्कचे आणि एसेल ग्रुपचे ते चेअरमन आहेत. पिठाची गिरणी चालक ते भारतीय माध्यमांचे बादशहा अशी त्यांनी ओळख निर्माण केली आहे. २९ ऑक्टोबर २00२ पासून ते झी टेलिफिल्म्स् लिमिटेडचे ते कार्यकारी संचालक आहेत. एस्सेल ग्रुप ऑफ कंपनीजचे ते प्रवर्तक आहेत. त्यांच्या उद्योगात टेलिव्हिजन नेटवर्क, मनोरंजन, केबल सिस्टीम, सॅटेलाईट कम्युनिकेशन, थीम पार्क, पॅकेजिंग, कौटुंबिक मनोरंजन केंद्रे आणि ऑनलाईन गेम यांचा समावेश आहे.मोहन सिंग ओबेरॉयशिमल्याच्या द सेसिल हॉटेलमध्ये महिन्याला ५0 रुपयाच्या पगारावर बिलिंग क्लर्क म्हणून कामास सुरुवात केलेल्या ओबेरॉय यांनी भारतामधील अलिशान अशा ओबेरॉय हॉटेल्सचा ग्रुप तयार केला. मोहनसिंग ओबेरॉय यांची कथा खूपच जबरदस्त आहे. पर्यटन आणि आदरातिथ्य व्यवसायात भारतात जागृती निर्माण होण्यापूर्वी या युवा किशोरवयीन मुलाने हॉटेल फ्लॅशमन सुरू केले. रावळपिंडीमध्ये याची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉटेल्सची उभारणी केली. सात देशात त्यांची ३५ हॉटेल्स आहेत. देशात हॉटेल्सचे जाळे उभे करणारे ते पहिले उद्योजक होते.गुलशन कुमारजेव्हा जेव्हा भारतीय संगीत उद्योगाचे नाव येते, त्यावेळी गुलशन कुमार यांचे नाव अग्रभागी असते. टी-सीरीजचे ते संस्थापक होते. प्रत्येक भारतीयांच्या मनात त्यांचे नाव कोरले आहे. चंद्रभान यांचे पुत्र म्हणून गुलशन एका सामान्य पंजाबी कुटुंबात जन्माला आले. दिल्लीतील दरियागंज भागात ते फळांचा रस विकत होते. नंतर त्यांनी कारकीर्द वेगळ्या क्षेत्रात सुरु केली. रेकॉर्ड आणि जुन्या ऑडिओ कॅसेट विक्रीचे दुकान सुरू केले. त्यानंतर त्यांनी संगीत उद्योगात पाऊल ठेवले. सुपर कॅसेट इंडस्ट्रीज नावाने त्यांनी स्वत:ची कॅसेट कंपनी काढली.कुंवर सचदेवापेन, स्टेशनरी विकण्यापासून सुरुवात केलेल्या कुंवर सचदेवा यांनी इन्व्हर्टरउद्योगात पाऊल ठेवले. त्यांचा प्रवास अडखळता आणि विविध वळणांचा आहे. सु-कॅम पॉवर सिस्टीम या इन्व्हर्टर विक्री करणार्‍या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असणार्‍या कुंवर यांनी उत्पादक, विक्री क्षेत्रात नाव कमावले. प्रेरणादायी व्यक्तिमत्व, दूरदृष्टी असलेला उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. जगातील ९0 देशात त्यांचा ब्रँड विकला जातो.