शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

आर्थिक महासत्तेच्या प्रवासात महिलांची भूमिका महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 06:50 IST

स्त्रिया बोलू लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या.

उद्या साजरा होणाºया महिला दिनाच्या निमित्ताने...अमेरिकेत महिलांना पुरुषांप्रमाणे  मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी सुरू झालेली चळवळ हे महिलांचे जागतिक स्तरावरील पहिले सामूहिक आंदोलन होते. हा क्रम निरंतर सुरू राहिला. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसºया आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा ‘जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा ठराव मांडण्यात आला.यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून 1918 साली इंग्लंडमध्ये व 1919 साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले. अशा रितीने महिला दिवसाला सुरुवात झाली.  भारतात 1943 साली पहिल्यांदा महिला दिवस साजरा करण्यात आला. 1957 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून साजरे केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.स्त्रिया बोलू लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालये तसेच अनेक घरांमध्येही महिला दिन साजरा होतो आहे. या निमित्ताने सीएनएक्सने भारताच्या भविष्यातील आर्थिक महासत्तेच्या दिशेने होणाºया प्रवासात महिलांची भूमिका कशी राहील, याचा आढावा घेतला. यावेळी शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांनी आर्थिक महासत्तेच्या दिशेने होणारा हा प्रवास महिलांच्या सहकार्याशिवाय होणे शक्य नसल्याचे आवर्जुन नमूद केले. महिला दिनाचा कार्यक्रमातून यशस्वी महिलांचा सत्कार केला जातो. अनेक वंचित व प्रतिभाशाली स्त्रियांना यातून प्रेरणा मिळावी असा उद्देश असेल तर तो करणे योग्यच आहे. 21 व्या शतकाकडे वाटचाल करताना स्त्रियांच्या परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. आजची स्त्री उच्चविभूषित आहे. तिला आपल्या हक्काची जाणीव आहे.ती अंतराळात पोहचली आहे. संशोधक, डॉक्टर, इंजिनीयर, साहित्य, कला, बँकिंग ते राजकारण या सर्वच क्षेत्रात ती मोठी झेप घेत आहे. संवादाच्या साधनांमुळे जग ‘ग्लोबल’ झाले. प्रगतीची नवी कवाडे उघडी झाली. देशाचा विक ास झपाट्याने सुरू आहे. यात महिलांचा वाटा निश्चितच फार मोठा आहे.