शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विंड चाईम विकत कशाला आणता? घरीच बनवा की! एकदम सोपं आहे.

By admin | Updated: May 22, 2017 18:43 IST

संगीताचा वेगळा आनंद तुम्हाला घरात विंड चाईमपासून मिळतो. शिवाय घर सजावटीतही याचा हातभार लागतो. हे विंड चाईम तुम्ही घरी सहज बनवू शकता.

- सारिका पूरकर गुजराथी

संगीत... मानवी जगण्याला, समाधान, उत्साह, प्रेरणा, चेतना, उमेद, जिद्द देणारी कला. संगीत या कलेतील हीच ताकद आपण दररोज अनुभवत असतो. पण ती केवळ हेडफोन, आयपॉडवर गाणी ऐकून. पण याव्यतिरिक्त संगीत चराचरात भिनलेलं आहे, त्याचाही आस्वाद घ्यायला हवा, नाही का? संगीताचा असाच वेगळा आनंद तुम्हाला घरात विंड चाईमपासून मिळतो. कारण हवेची झुळूक आल्यावर या विंडचाईममधून जे सुमधूर स्वरतरंग उमटतात ते खूपच आल्हाददायक, मंद-धुंद करणारे असतात. फेंगशूई वास्तुशास्त्रातील विंड चाईम हा प्रकार आता भारतातही लोकप्रिय झाला आहे. वास्तुशास्त्राचे माहित नाही पण कलाप्रेमी, संगीतप्रेमींसाठीही विंडचाईम हा प्रकार खूप छान आहे. शिवाय घर सजावटीतही याचा हातभार लागतो. हे विंड चाईम तुम्ही घरी सहज बनवू शकता.

चाव्यांचे विंड चाईम

 घरात वापरात नसलेल्या काही चाव्या असतील तर गोळा करुन ठेवा. गंजल्या असतील तर सॅण्डपेपरनं घासून, धुवून कोरड्या करा. या चाव्यांना आकर्षक रंगात रंगवून घ्या. आकर्षक रंगाची जाड लोकर घेऊन चावी बांधून घ्या. लोकरीची उंची जरा जास्त हवी. खराब झालेली कूकरची रिंग घेऊन त्यावरही लोकर, सुतळी गुंडाळून घ्या. आता विविध आकाराच्या चाव्या लोकरीच्या सहाय्यानं रिंगवर वर्तुळाकार बांधून घ्या. यातून एकदम मस्त कलरफूल विंड चाईम तयार होईल.

 

               

 

पेपर कपचे विंड चाईम

मोठया आकाराचे पेपर कप घ्या. त्यांना रंगवून घ्या. डिझाइन्स अन डॉट्सनं ते सजवा. कप पालथा घाला. (उलटा करा, पिण्याची बाजू खाली). आता दोऱ्यात आकर्षक क्रिस्टल मणी, बीड्स, पाईप्स ओवून घ्या. दोऱ्याची लांबी खूप लांब आणि आखूड नको, बेताची हवी. आता कपच्या खालच्या मोकळ्या बाजूवर गोलाकार छिद्र करुन हे ओवलेले लटकन बांधून टाका. फक्त पेपर कपचे विंड चाईमही बनवता येते. त्याकरिता तीन विविध आकारातील पेपर कप घ्या, (मोठा, त्यापेक्षा लहान व त्यापेक्षा आणखी लहान) तीनही पेपर कप्सना वेगवेगळ्या आकारात रंगवून डिझाईन्स काढून घ्या. हे तीन कप आधी लहान, त्यावर थोडा मोठा व त्यावर सर्वात मोठा या क्रमानं नॉयलॉन दोऱ्यात ओवून घ्या. ओवताना सर्वात लहान घंटी (बाजारात सहज मिळते) आधी ओवा, त्यानंतर कप ओवून घ्या.

 

           

 

 

इको फ्रेंडली विंड चाईम

बांबूच्या बारीक काड्यांना रंगवून, सजवून त्या दोऱ्यात ओवून घ्या. लहान-मोठ्या आकारातील या काड्या रिंगवर अडकवल्या तर इको फ्रेंडली विंड चाईम तयार होईल.

विंड चाईमसाठी विविध रिंग, बेस बाजारात मिळतात, त्याचाही वापर करता येतो. विविध आकारातील शंख, शिंपले ओवूनही सुंदर विंड चाईम तयार होते.

 

                     

जरा हटके विंड चाईम

किचनमध्ये वापरात नसलेले स्टीलचे चमचे दोऱ्यात ओवून एका प्लेटवर छिद्रं करुन अडकवल्यास हटके विंड चाईम तयार होईल. रिकामे पत्र्याचे टीन रंगवून, सॉफ्ट ड्रिंकच्या मेटलच्या झाकणांपासून सुंदर विंड चाईम सहज बनवता येतील. एकदा तुम्हीही करून बघा!