शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

चव ट्रॅडिशनल लूक वेस्टर्न.. असले पदार्थ कधी बनवले आणि खाल्ले आहेत का? मग एकदा आइस्क्रिमच्या कोनामध्ये कॉफी पिऊन बघाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 19:24 IST

अत्यंत मेहनतीनं बनवलेले, चवदार, रुचकर पदार्थ आकर्षकरित्या सर्व्ह करण्यालाही खूप महत्व आहे.

 

-सारिका पूरकर-गुजराथी

कोणताही पदार्थ माणूस आधी नाकानं आणि नंतर डोळ्यानं खातो असं म्हटलं जातं. कारण प्रत्येक पदार्थाची चव त्याच्या विशिष्ट वासानं कळते, उदाहरणच द्यायचं झालं तर हिंगाची, कढीपत्त्याची खमंग फोडणी बसली की वरण, कढीचा एक छान सुगंधी घरभर दरवळतो. त्या वासावरुनच आपली भूक चवताळते. आणि त्यानंतर प्रत्यक्ष तो पदार्थ कसा सर्व्ह केला गेलाय, तो कसा सजवून आपल्यासमोर मांडलाय हे पाहिलं की मग तर भूक खवळतेच. छान स्पंजी, लुसलुशीत ढोकळ्यावर कोथिंबीर-खोबऱ्याची पखरण, त्यावर पुन्हा खमंग फोडणी ओतली की जो नजारा दिसतो ना तो तुम्हाला चटकन ढोकळ्याकडे खेचत नेतोच. म्हणूनच अत्यंत मेहनतीनं बनवलेले, चवदार, रुचकर पदार्थ आकर्षकरित्या सर्व्ह करण्यालाही खूप महत्व आहे.

हॉटेलच्या मेन्यूकार्डमधील भारतीय पारंपरिक पदार्थांची मागणी तर दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र ही मागणी केवळ भारतापुरतीच मर्यादित न ठेवता जगभरात निर्माण करायची असेल तर पारंपरिक भारतीय पदार्थांना पाश्चात्य पद्धतीचा सर्व्हिंग साज चढवायला हवा.. नाही का? म्हणजे सर्व्ह करण्याचा अंदाज परदेशी मात्र पदार्थ देशी ‘थोडं तुमचं-थोडं आमचं’ असं करुन हे जर जुळवून आणलं तर हे पदार्थ आणखी लोकप्रिय होतील . शिवाय याचे नेक्स्ट व्हर्जन म्हणून भारतीय खाद्यसंस्कृती ग्लोबल होण्यास खूप मोठी मदत मिळेल.

काय करता येईल? असं म्हणताय? या काही भन्नाट कल्पना आहेत एकदा करून तर पाहा!

१) कॉफी विथ कोन

भारतीय जसे वाफाळत्या, आले घातलेल्या चहाचे भोक्ते आहेत ना तसेच ते कॉफीचे देखील आहेत. म्हणूनच सध्या प्रत्येक मालिकेत ही जो-तो, उठ-सूठ एकमेकांना कॉफी देऊ, मस्त कॉफी घेऊ असा आग्रह धरतोय. ही कॉफी दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात पिकते. कॉफीचे मळे येथे मोठ्या संख्येनं आहेत. येथेच कॉफीच्या बियांवर प्रक्रिया करुन ती बाजारात पावडर स्वरुपात आणली जाते. कॉफी उत्पादन भारतात होत असल्यामुळे कॉफीची एक पेय म्हणून लोकप्रियता आणखी वाढविण्याची जबाबदारीही घ्यायला हवी. नाही, तसे देशभरात अनेक कॅफे, कॉफी हाऊस आहेत. परंतु, तरीही कॉफीचा मेकओव्हर व्हायला हवा आहे. किती दिवस भले मोठे मग, काचेचे ग्लास यामधून ती सर्व्ह करत राहणार... त्याकरिता एक कूल आयडिया आहे. ती म्हणजे कॉफी कोनमध्ये सर्व्ह करण्याची. एरवी आइस्क्रिम आपण कोनमधून खातोच की..मग तोच कोन कॉफीसाठी वापरता येईल. कोल्ड कॉफीसाठी तर ही आयडिया परफेक्ट ठरेल. कोनवर बाहेरुन चॉकलेट सिरप, चॉकलेट चिप्स, सुक्यामेव्याचे तुकडे, रेनबो स्प्रिंकलर्स लावून कोन आणखी कॅची करता येईल. कॉफी ओतल्यावर त्यावर क्रीमनं सजावट केली तर कॉफीला आणखी बहार आणता येईल. आणखी एक टिप. हेच कोन तुम्ही मुलांना चॉकलेट मिल्कशेक, चॉकलेट मिल्क देण्यासाठी देखील वापरु शकता.

 

२) भजी-पकोड्यांना द्या फ्राईजचा लूूक

भारतात भजी,पकोडे यांची भरपूर चवदार व्हरायटी पाहायला मिळते. तसेच ती मठरी, शंकरपाळे, पापड या तोंडीलावणं स्रॅॅकच्या बाबतीही पाहायला मिळते. वर्षानुवर्षे जीभेवर रेंगाळणारे हे पदार्थ आज फ्रेंच फ्राईज, फिंगर चिप्स यांना मात देण्यात कुठेही कमी नाहीयेत. त्यांनाही हवा आहे नवा लूक. त्यासाठीच गोलाकारातून त्यांना बाहेर काढून फ्राईजचा लूक दिला तर किती भन्नाट दिसतील हे पदार्थ. याचप्रमाणे कुकीज देखील फ्राईजच्या आकारात कापून बेक केल्या जाऊ शकतात.

३) गोडाचे पदार्थही नव्यानं सजवा

पॅनकेकचा एकावर एक थर रचून, त्यावर भरपूर मध, स्ट्रॉबेरीज, केळीचे काप, अक्रोड, क्रीम लावून सजवलं जातं. जगभरात हा पदार्थ लोकप्रिय आहे. हाच प्रयोग आपल्या मालपुव्याच्या बाबतीतही करता येईल की ! एवढंच कशाला उत्तपम एकावर एक रचून नारळाची चटणी, सांभार ओतून या लोकप्रिय पदार्थांना पॅनकेकसारखा वेस्टर्न लूक देता येईल.

४) आईस्क्रिम बाऊल्स

आपण कटोरी चाट खातो ना तसे अमेरिकेत रेस्टॉरण्ट्समध्ये आइस्क्रिम कोन, कपमध्ये न खाता मैदा, व्हॅनिला, साखरेपासून तयार केलेल्या अन बेक केलेल्या चुरो बाऊल्समधूून सर्व्ह केले जाते. आपण बाऊलचा हा फंडा आपल्या रबडी, जिलेबी, खीर, घेवर, कुल्फी या पारंपरिक चवीच्या पदार्थांसाठी वापरु शकतो. हे बाऊल्स कोनप्रमाणेच कुरकुरीत लागतात. त्यामुळे त्यातील पदार्थालाही ते क्रंची चव देतात. सर्वात महत्वाचे, भारतातील रेस्टॉरण्ट्समध्ये हा प्रयोग होईल तेव्हा होईल, पण तोवर आपण घरी ट्राय करायला काय हरकत आहे? तेवढंच काहीतरी नवीन आणि भन्नाट!