शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

छत्री का पर्सनल होना तो बनता है!

By admin | Updated: June 24, 2017 14:49 IST

छत्री पावसाळ्यात तर सगळेच वापरतात, पण त्या छत्रीला ‘आपलंसं’ कसं करायचं?

पवित्रा कस्तुरेछत्री पावसाळ्यात घ्यावीच लागते. आपण घेतोही. म्हणजे काय करतो दुकानात जातो. आवडेल ती छत्री उचलतो. पैसे देतो. वापरतो. काहीजण अनेक वर्षे छत्र्या दुरुस्त करुन वापरत राहतात. मात्र त्या छत्रीवर आपलं काही प्रेमबिम असतं का? की पावसाला काळे झेंडे दाखवायचे पूर्वी छत्र्यांचे आता रंगीत झेंडे आले इतकंच. मात्र छत्री ही आपलं पावसाळ्यातलं एक स्टाईल स्टेटमेण्ट होवू शकते हे आपल्या लक्षातही येत नाही. पण ज्यांच्या येतं, त्यांच्या छत्र्या पहा. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक रंग त्या छत्रीत दिसतात. आणि आपण छत्री पाहून सांगू शकतो वापरणाऱ्याच्या दिल का हाल! आपली छत्री पाहून आपल्याला कुणी बावळं म्हणू नये आणि दुसरं म्हणजे पावसाळा मस्त एन्जॉय करता यावा म्हणून जरा मस्त पर्सनलाईज्ड टच देवू आपल्या छत्रीला!

१) हल्ली छत्री रंगवण्याचे बरेच वर्कशॉप घेतले जातात. त्याला जाता येईल. आपण आपली छत्री रंगवू.२) ते नको असेल तर आपल्या छत्रीवर आपणच एखादं छोटं चित्र काढू.३) छत्रीला काही स्टिकर लावता येतात, त्यानं आपली छत्री गर्दीत ओळखूही येते, दिसतेही वेगळी.४) लटकन मिळतात ना बाजारात, तसे लटकन छत्रीला लावता येतात.५) आपल्या ड्रेसला मॅचिंग छत्र्या काहीजणी वापरतात. पण ते करणं शक्य नसतंच सगळ्यांना म्हणून मग ब्राईट कलरची छत्री वापरावी. ती दिसते मस्त.६) आपला मूड कसाही असो, छत्री छान असेल तर ती आपल्याविषयी इतरांना बरंच काही सांगते, आपल्याही नकळत.