अमेरिकन निवडणुकीमुळे मोडला ट्विटरचा रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 17:54 IST
यंदा मतदानाच्या दिवशी सुमारे ३.५ कोटी ट्विट्स करण्यात आले.
अमेरिकन निवडणुकीमुळे मोडला ट्विटरचा रेकॉर्ड
भारतात लोक ५०० ते १००० च्या नोटा मोजण्यात आणि परत करण्याच्या गडबडीत आहेत तर अमेरिकेत राष्ट्राध्यपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीच्या निकालाची चर्चा आहे.संपूर्ण सोशल मीडिया याविषयीच्या फोटो, ट्विटसने भरलेला आहे. यंदा मतदानाच्या दिवशी सुमारे ३.५ कोटी ट्विट्स करण्यात आले. यामुळे २०१२ च्या मतदान दिवसाचा सर्वाधिक ट्विट्सचा रेकॉर्ड मोडित निघाला आहे.एका संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ‘इलेक्शन डे’च्या दिवशी निवडणुकीसंबंधी ३.५ कोटींपेक्षा जास्त ट्विट्स करण्यात आले आहेत. यंदा युजर्सना लाईव्ह व्हिडिओचासुद्धा पर्याय देण्यात आला होता.‘जॅकड्रॉ रिसर्च’मधील मुख्य विश्लेषक जॅन डॉसन यांनी सांगितले, ‘चालू घडामोडींवर भाष्य करण्यासाठी ट्विटर हे प्रमुख व्यासपीठ आहे तर फेसबुकवर लोक त्यांच्या आवडीच्या विषयांवर बोलणे पसंत करतात.’सर्व भाकित खोटे ठरवत डोनल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. हिलरी क्लिंटन यांचा दारुण पराभव करत ते जगातील सर्वात शक्तीशाली देशाचे प्रमुख बनले आहेत. वर्षभर सुरू असणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर अमेरिक न जनतेने ट्रम्प यांना कौल दिला. त्यामुळे अमेरिकेची पहिला महिला राष्ट्राध्यक्ष होण्याचे हिलरींचे स्वप्न अपूर्ण राहिले. सोशल मीडियावरसुद्धा ट्रम्प आघाडीवर आहेत. ट्विटर फॉलोवर्सचा विचार करता ट्रम्पचे १.३१ कोटी फॉलोवर्स असून हिलरी यांना १.०४ कोटी लोक फॉलो करतात.