शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

​फेसबुकवर फेक अकाउंट वापरणाऱ्यांचे व्हॉटस्अ‍ॅपही होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 20:41 IST

व्हॉटस्अ‍ॅप व फेसबुकने एकत्र मिळून नवी अपटेड आणली आहे, ज्याद्वारे तुमचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर आणि फेसबुक अकाउंट लिंक केले जाणार.

फेसबुकवर खोट्या-बनावटी अकाउंटसच्या माध्यमातून अनेक जण खोडसाळपणा करत असतात. अशी फसवणूक रोखण्यासाठी आता फेसबुकने अधिक कडक पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉटस्अ‍ॅप व फेसबुकने एकत्र मिळून नवी अपटेड आणली आहे, ज्याद्वारे तुमचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर आणि फेसबुक अकाउंट लिंक केले जाणार.सोप्या शब्दांत सांगायचे तर, एकाच स्मार्टफोन/टॅब्लेटवर जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुक अ‍ॅप इन्स्टॉल केलेले असेल तर कंपनी त्याला इंटरलिंक्ड करणार. दोन्ही ठिकाणी वेगवेगळे मोबाईल क्रमांक जरी वापरले असेल तरी एकच डिव्हाईस असल्यामुळे ते शक्य होणार आहे. त्याद्वारे फेक अकाउंटस्शी निगडित व्हॉटस्अ‍ॅपही बंद केले जाऊ शकते.ग्राहकांना अधिक सुखकारक आणि सुरक्षित अनुभव देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. त्याचाच एक भाग म्हणून हे नवीन फीचर विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने दिली. आता हे जरी खरे असले तरी आॅनलाईन जाहिराती अधिकाधिक पर्सनलाईज करण्यासाठी या फीचरचा कंपनीला खूप फायदा होणार आहे. तुम्ही जर आॅनलाईन शॉपिंग करताना मोबाईल क्रमांक दिला असेल तर ती कंपनी जेव्हा फेसबुकवर जाहिरात करेल तेव्हा तुम्हाला ती हमखास दिसणार. अशा तºहेने फेसबुकने एकाच दगडात दोन पक्षी मारले.