शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

या सहा प्रकारे घरातल्या भिंतींना देता येतो पर्सनल टच! भिंती सुंदर दिसतात आणि डोळेही सुखावतात!

By admin | Updated: May 11, 2017 18:25 IST

स्वत:च्या हातानं भिंतीवर चित्रं काढण्याचा हा ट्रेण्ड आता नव्यानं लोकप्रिय झाला आहे. या पेंटिंगमुळे घरातील मोठ्या भिंती सहज डेकोरेट होतात आणि भरीव दिसतात.

 

-सारिका पूरकर-गुजराथी

पूर्वी घराच्या भिंती रंगवण्यासाठी आकर्षक रंग नव्हते, वॉलपेपर्सचा तर प्रश्नच नव्हता. मातीनं, शेणानं भिंती सारवून त्यावर हातानं जमेल तशी चित्रं चितारुन भिंती सजवल्या जात असत. वारली चित्रकला, मधुबनी चित्रकलेचा उगम यातूनच झाला. निसर्ग, मानवी संबंध याचेच प्रतिबिंब या चित्रशैलीत आहे. थोडक्यात स्वत:च्या हातानं भिंतीवर चित्रं काढण्याचा हा ट्रेण्ड आता नव्यानं लोकप्रिय झाला आहे. वॉल पेंटिंग हा होम डेकोरमधील सर्वात क्रिएटिव्ह आॅप्शन बनला आहे. या पेंटिंगमुळे घरातील मोठ्या भिंती सहज डेकोरेट होतात आणि भरीव दिसतात. शिवाय आपण निसर्गाच्या सानिध्यात असल्याचाही फील येतो.

१) झाडं आणि पानं

हे डिझाईन वॉल पेंटिंगमध्ये खूप लोकप्रिय आहे. काळा,तपकिरी या दोन रंगांत हे डिझाईन विशेष खुलून दिसतं. भिंतीवर झाडाचा आकार रेखाटून त्याच्या फांद्या, बारीक पानं, त्यावरचे पक्षी हे फक्त प्लेन रंगात रंगवले जातात. दिसायला अगदी सुंदर आणि पर्सनल टच मिळतो. हॉलमध्ये सोफ्यामागची जी भिंत असते, तेथे हे पेंटिंग केलं जातं. तसेच बेडरुममध्ये बेडमागच्या भिंतीवरही केलं जातं. याच डिझाईनमध्ये झाडांच्या फांद्यांवर मधून-मधून तुम्ही फॅमिली फोटोज फ्रेम करुन लावल्यास फॅमिली ट्रीचा फील येतो. झाडाच्या फांद्याच्या ठिकाणीच काही शेल्फ बसवून त्यावर वस्तू ठेवल्यास शेल्फचा एक वेगळा प्रकारही होतो.

 

      

२) प्राणी-पक्षी

मुलांच्या खोलीत हे डिझाईन्स रेखाटून घरातच झू तयार होतं. रंग मात्र काळा, तपकिरीच हवा, रंगीबिरंगी नको.

3. फ्री हॅण्ड डिझाईन 

मुक्त छंद प्रकारातील कोणतंही डिझाईन भिंतीवर रेखाटून हे डिझाईन देखील काळा, तपकिरी रंगात रंगविल्यास शोभून दिसतं. हा प्रकार बेडरुममध्येही सूूट होतो. हार्ट शेप, फुलपाखरं यांचे विविध आकार चितारता येतात. घरातील कमानीवर, जिन्याच्या बाजूच्या भिंतीवरही हे छान दिसतात.

 

                  

४) बबल्स डिझाईन

विविध वर्तुळाकार एकात एक गुंफून बबल्स डिझाईन तयार होतं. आऊटलाईन आणि आतील भाग भरीव या पद्धतीचे हे बबल्स अ‍ॅबस्ट्रॅक्ट लूक देतं. हे डिझाईन रंगवायलाही सोपं जातं. आकार बिघडण्याचे चान्सेसच नाहीत.

५) इमारती आणि संगीतातील नोट्स

तुम्हाला संगीत आवडत असेल तर सुरांच्या नोट्स, स्वरलहरी भिंतीवर चितारता येतात. तसेच आधुनिक, मॉडर्न टच घराला द्यायचा असेल तर एकाला एक लागून इमारतींचे आऊटलाईन चितारुन सिटीलाईट फ्रेम उभी करता येते.

 

         

६) जशी रुम तसं पेंटिंग

वर नमूद केलेले डिझाईन्स हे काही बेसिक आणि लोकप्रिय डिझाईन्स आहेत. मात्र घरातील प्रत्येक रुममध्ये त्या त्या रुमला साजेसं पेंटिंगही भिंतीवर करता येतं. किचनमध्ये फळं, भाज्या चितारता येतात. मुला-मुलींच्या खोलीतही कार्टून्सबरोबरच अल्फाबेट्स, अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग साकारता येतात. याशिवाय कलरफूल वेव्ह्ज (लाटा), चेहरे (आऊटलाईन वर्क), स्ट्रिप्स (पट्टे), चेक्स (चौकटी),ब्रिक्स, जॉमेट्रिक आकार देखील भिंतीवर रेखाटून भिंत सजवण्याचा ट्रेण्ड लोकप्रिय झाला आहे.