शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

TECH : कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये येणारे व्हायरस टाळण्यासाठी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2017 18:14 IST

बऱ्याचदा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर इंटरनेट सर्फिंग करताना नकळत व्हायरस शिरतो. मात्र काही गोष्टींची काळजी घेतल्यास सिस्टिमला होणारा वायरसचा धोका टाळू शकतो.

-Ravindra Moreबऱ्याचदा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर इंटरनेट सर्फिंग करताना नकळत व्हायरस शिरतो. यामुळे आपल्या एवढ्या महागड्या डिवाइसला हानी पोहचते. मात्र काही गोष्टींची काळजी घेतल्यास सिस्टिमला होणारा वायरसचा धोका टाळू शकतो.काय काळजी घ्याल?* हॉलिवूडच्या सेलिबे्रटींना सर्च करताना बहुतांश हॉलिवूडच्या सेलिब्रेटींना सर्च करताना आपल्या संगणकात किंवा लॅपटॉपमध्ये व्हायरस शिरू शकतो. कारण प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या नावासोबत अनेकदा मालवेअर व वायरस अटॅच असतात. २०१५ मध्ये इंटेल सिक्युरिटी ग्रुपने मोस्ट डेंजरस सेलिब्रिटींच्या नावांची यादी जाहीर केली होती. यांना सर्च केल्याने सिस्टिममध्ये २० टक्के वायरस येतात. यामध्ये कॅटी पेरी, ब्रिटनी स्पिअर्स, ल्यूक ब्रायन यासारखी नावे समाविष्ट आहेत. म्हणून सेलिब्रिटींचे सिक्रेट फुटेज, कॉन्ट्राव्हर्सिजवर क्लिक करताना सतर्क राहा. विश्वासार्ह वेबसाईट किंवा सेलिब्रिटींच्या आॅफिशिअल वेबसाईटवर जाऊनच माहिती घ्या. * सुरक्षित वेबसाईट ओळखा आतापर्यंत http हे प्रत्येक वेबसाईटच्या विश्वासार्हतेचे मानक मानले जायचे. परंतु अनेकदा http वेबसाईटवरूनही वायरस येतात. म्हणून कुठल्याही अनोळखी वेबसाईटवर जाताना http च्या आधी लॉकचा लोगो आहे किंवा नाही हे तपासून घ्या. * क्लाऊड सर्व्हिसचा वापर करताना सावध राहाक्लाऊड सर्व्हिस आपला डेटा सुरक्षित ठेवण्याचे एक माध्यम मानतो मात्र यामार्फत तुमच्या सिस्टिममध्ये सहज वायरस येऊ शकतो. क्लाऊड सर्व्हिसचा वापर करताना डेटा एन्क्रिपशन मोडवर असल्याची खात्री करून घ्या. * अद्ययावत अँटीव्हायरस इन्स्टॉल कराअँटीवायरस अपडेट असल्यावरच चांगले काम करतो. कॉम्प्युटरमध्ये दररोज वायरस, वॉर्म्स आणि ट्रोजन हॉर्सेस तयार होतात. यांच्याशी लढण्यासाठी अँटीवायरस अपडेट असणे आवश्यक आहे. * आॅनलाईन मूव्ही पाहणे सुरक्षितटोरंटसारख्या मालवेअर फ्री वेबसाईटवरून सिनेमा, गाणी किंवा अन्य मीडिया डाऊनलोड करताना तो वायरस इन्फेक्टेड नाही, याची खात्री करून घ्या. मूव्ही डाऊनलोड करण्यापेक्षा आॅनलाईन पाहणे अधिक सुरक्षित आहे.