शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कळकट किचनही एकदम आर्टिस्टिक दिसू शकतं. फक्त या नऊ गोष्टी वाचून तर पाहा!

By admin | Updated: May 10, 2017 17:03 IST

किचनमधील कला-कुसर तर फार सोपी आहे. फार झंझट नसते त्यात.एखादं काही केलं तरी कळकट वाटणारं आपलं किचन एकदम कलात्मकही दिसू शकतं.

- सारिका पूरकर-गुजराथीकला-कुसरीच्या वस्तुंनी केवळ घरातला हॉल, बैठकखोली किंवा बेडरुमचं सजवता येते असा समज असेल तुमचा तर तो आधी दूर करा. कारण किचनमध्येही तुम्हाला क्राफ्टी लूक द्यायला बराच वाव असतो. उलट किचनमधील कला-कुसर तर फार सोपी आहे. फार झंझट नसते त्यात.एखादं काही केलं तरी कळकट वाटणारं आपलं किचन एकदम कलात्मकही दिसू शकतं. किचनमधल्या कलाकुसरीची हीच तर कमाल आहे. किचनमधली कलाकुसर१) चहा, कॉफीचे मोठे मग असतील तर त्यावर नवीन रंगाचा प्लेन वॉश देऊन घ्या. वाळला की मग त्यावर शार्पी पेन (मार्करसारखे पेन ), अ‍ॅक्रेलिक रंगांनी आवडीचे डिझाईन्स बनवा. कधी नुसतेच ठिपके द्या रगांचे, कधी नावाची आद्याक्षरं रंगवा नाहीतर पानं-फुलं अन कार्टून रंगवा.  

      

 

२) लाकडी चमचे असतील तर त्यांच्या हॅण्डलवर आवडीचा रंग द्या. पूर्ण चमचा रंगवायचा नाहीये. फक्त हॅण्डलचा काही भाग रंगीत करायचा आहे. निआॅन रंगात रंगवलं तर अजून छान दिसेल. रंगवायची सोपी पद्धत म्हणजे चमच्याचे हॅण्डल थेट रंगात बुडवून निथळून घ्या. वाळू द्या. ते रंगीत चमचे पण खूप सुंदर दिसतात. स्टीलच्या चमच्यांनाही तुम्हाला याच प्रकारे कलरफूल बनवता येईल.

३) काही कंटेनर्स, जार्स असतील तर त्यावर लेबल पेंट करा. त्या त्या कंटेनरमधील वस्तूचं नाव लेबल पेंट करुन घाला. हे हटके लेबल्स फक्त तुमच्याकडेच असतील, अक्षरं जर कॅलिग्राफिक स्टाईलनं पेंट केलेत तर आणखी छान दिसेल.४) काही जार्सची लीड (झाकणे) प्लेन पांढऱ्या रंगात रंगवून टाका. एरवी कलरफूल लीड्स असतातच म्हणून हा लूकही कधीकधी छान दिसतो, चेंजही होतो.

 

             ५) प्रोटीन पावडरचे रिकामे टीन असतील तर त्याभोवती सुतळी गुंडाळून स्पून रॅक , स्पून होल्डर तयार करता येतो. रस्टिक स्पून होल्डर काही मीनिटा तयार होतो. याच टीनला बाहेरुन आवडीचा रंग देऊन खिळ्यानं काही छिद्रं पाडून घ्या. यात लाईट (बल्ब) सोडा, छान पेण्डंट लॅम्प तयार होतो. ६) बाजारात रेडिमेड पॉलिश्ड पेबल्स मिळतात (नदी, समुद्र किनारी सापडतात तेच दगड-गोटे फक्त पॉलिश केलेले आणि विविध आकारात असतात) त्यात मध्यम आकाराचे पेबल्स निवडा. प्लायवूडचा छोटा गोलाकार, चौकोनी तुकडा घेऊन त्यावर हे पेबल्स जवळ-जवळ चिकटवून घ्या. वाळू द्या. किचनमध्ये एक सुंदर कोस्टर तयार होतं. ७) हॅण्ड मिक्सर वापरत असाल तर त्यालाही तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगात रंगवून कलरफूल लूक देऊ शकता.८) वाशी टेपच्या सहाय्यानं किचन कॅबिनेट्सच्या बॉर्डर्सला डेकोरेटिव्ह बनवता येतं. ९) जुने स्टीलचे ग्लास जे वापरत नसाल ते एका अशाच वापरात नसलेल्या एखाद्या पोळपाटावर (शक्यतो लाकडी घ्या) चिकटवून टाका. एका पोळपाटावर तीन ग्लास आरामात बसतात.यात चमचे, सुरी, रवी असे सर्वकाही ठेवू शकता. झाले तुमचे आर्टिस्टिक स्पून होल्डर तयार.