शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

Tech : स्मार्टफोन घेताना ‘या’ गोष्टींकडे आवर्जून द्यावे लक्ष !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2017 16:28 IST

बऱ्याचदा स्मार्टफोन घेताना गोंधळ उडतो. कोणता आणि कसा घ्यायचा हा आपल्यासमोर मोठा प्रश्न उपस्थित राहतो. जाणून घ्या काय काळजी घ्यावी ती...

बदलत्या टेक्नोसिव्ह युगात स्मार्टफोन प्रत्येकासाठी गरजेचा झाला आहे. आज प्रत्येक गोष्टींसाठी स्मार्टफोन आवश्यक आहे. पण बऱ्याचदा स्मार्टफोन घेताना गोंधळ उडतो. कोणता आणि कसा घ्यायचा हा आपल्यासमोर मोठा प्रश्न उपस्थित राहतो. आज आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे आपण योग्य स्मार्टफोनची निवड करु शकता. कॅमेराफक्त जास्त मेगापिक्सेलचा कॅमेरा म्हणजे चांगला कॅमरा असं असतंच असं त्याचा अ‍ॅपर्चर स्पीडही पाहावा लागतो. जर तुम्ही फोटोग्राफीचे शौकीन असाल तर तुम्ही १६ मेगापिक्सेलचा आणि f/2.0 अ‍ॅपर्चर असलेला कॅमेराफोन घेऊ शकता. जर तुम्ही जास्त फोटो काढत नसाल तर ८ ते १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरेसा ठरू शकतो.स्क्रीन साईझआपल्याकडे स्क्रीन साईझची क्रेझ मोठी आहे. जेवढी मोठी स्क्रीन तेवढा फोन चांगला असंच सगळ्यांना वाटतं. पण तुम्ही कुठल्या कारणासाठी स्मार्टफोन घेत आहात यावरून तुमची स्क्रीन ठरते. तुम्ही सिनेमा पाहायला किंवा गेम्स खेळण्याच्या दृष्टीने स्मार्टफोन घेणार असाल तर ५.५ इंच ते ६ इंची स्क्रीन असणारे फोन्स तुम्ही घेऊ शकता. तु्म्ही आॅफिसच्या कामासाठी किंवा फक्त ई मेल्स पाहण्यासाठी तुमच्या फोनचा वापर करणार असाल तर ५ ते ५.५ इंचाची स्क्रीन पुरेशी ठरू शकते. ६ इंचापेक्षा जास्त स्क्रीनसाईझचे फोन्स हातात धरायला फारच गैरसोयीचे ठरू शकतात.प्रोसेसरजर तुम्ही अनेक गेम्स खेळणार असाल तसंच मोठ्या कपॅसिटीचे फोटो आणि व्हिडिओ एडिट करणार असाल तर स्नॅपड्रॅगन ६५२ किंवा ८२०/८२१ चा प्रोसेसर असणारा फोन विकत घ्या.बॅटरीबॅटरीची निवड तुमच्या वापराप्रमाणे करावी. जर तुमच्या स्मार्टफोनचा वापर हेवी असेल म्हणजेच तुम्ही खूप अ‍ॅप्स आणि गेम्स खेळत असाल तर ३५०० एमएएच बॅटरी असलेला फोन तुम्हाला उपयोगी ठरू शकतो. जर तुमचा सेलफोन वापर मर्यादित असेल तर मात्र ३००० एमएएच क्षमता असलेला फोन तुम्ही वापरू शकता. आॅपरेटिंग सिस्टिम व्हर्जनतुम्ही जर अँड्रॉईड फोन घेणार असाल तर अँड्रॉईड ६.० किंवा त्याच्या थोड्याच आधीची आॅपरेटिंग सिस्टिम असलेला फोन सिलेक्ट करा. अँड्रॉईड ७ चा फोन घेणं शक्य असेल तरच तो नक्कीच घ्यावा.स्पीकर्सजर तुम्ही तुमच्या मोबाईलवर फिल्म्स आणि व्हिडिओज् बघणार असाल तर हँडसेटच्या पुढच्या भागात स्पीकर्स असावे. यामुळे तुम्ही लँडस्केप मोडमध्येही व्हिडिओ चांगल्याप्रकारे पाहू शकता.सध्याचा काळ फक्त जाहिरातींना भुलून स्मार्टफोन घ्यायचा नाही. तुमच्या गरजेनुसार अनेक स्मार्टफोन्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्या स्पेसिफिकेशन्सचा अभ्यास करून जर मोबाइल निवडला तरच तो तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो.