शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

SURVEY : ​लग्नाबाबत भारतीय तरुणाईची काय आहे पसंती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 13:11 IST

लग्नाअगोदर सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली असते. लग्न करण्याअगोदर विविध प्रकारचे विचार मनात घोंगवत असतात.

-Ravindra More‘शादी के लड्डू, जो खाए पछताए, और जो न खाए ओ भी पछताए !’ असे म्हटले जाते. लग्नाअगोदर सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली असते. लग्न करण्याअगोदर विविध प्रकारचे विचार मनात घोंगवत असतात. चला मग भारतीय तरुणाई लग्नाबाबत काय विचार करते, याचा खुलासा एका सर्वेक्षणात झाला असून याबाबत आज जाणून घेऊया. अविवाहित तरुण-तरुणींचे लग्नाबाबतचे विचार जाणून घेण्यासाठी एका वेबसाईटने नुकताच एक सर्व्हे केला. त्यात लग्नामुळे आयुष्यात भावनात्मक आणि आर्थिक स्थैर्य येईल, असं बहुतांश तरुणाईला वाटतं. या आॅनलाईन सर्वेक्षणात २५ ते ३२ वर्षांदरम्यानच्या १४,७०० जणांनी सहभाग घेतला होता. यात ४७ टक्के तरुणी आणि ५३ टक्के तरुणांचा सहभाग होता. त्यात सुमारे २०.५ टक्के तरुण आणि २३.१ टक्के तरुणींनी सांगितलं की, ‘ते लग्नासाठी आणखी वाट पाहू शकत नाहीत.’ तर १२.२ टक्के तरुण आणि १०.३ टक्के तरुण म्हणाले की, ‘आमचा जन्म लग्नासाठी झालेला नाही आणि आम्हाला लग्नात रस नाही.’ याशिवाय १८.२ टक्के तरुण आणि १३.२ टक्के तरुणी द्विधा मनस्थितीत आहेत. लग्न करण्याबाबत त्यांचा ठोस निर्णय झालेला नाही.लग्नासाठी आमचा जन्म झालेला नाही, असं सांगणाऱ्या तरुण आणि तरुणींना याचं कारण विचारलं असता. ३५.१टक्के तरुण आणि २७.२ टक्के मुलींनी सांगितलं की, ‘त्यांना जबाबदारी स्वीकारायची नाही.’ तर ‘आमचा लग्नावर विश्वास नाही,’ असं २३.२ टक्के मुलं आणि २१.३ टक्के मुलींनी सांगितलं.सुमारे २६.३ टक्के मुलं आणि २०.३ तरुणी म्हणतात की, ‘दीर्घ काळासाठी संसारात अडकून राहायचं नाही.’ तर ‘लग्नानंतर आयुष्यात होणाºया बदलाची भीती वाटते,’ असं १५.४ टक्के पुरुष आणि ३१.२ टक्के महिलांनी सांगितलं.लग्नानंतरचा सर्वात मोठा फायदा काय?, असं विचारलं असता २५.७ टक्के पुरुष आणि ३४.७ टक्के महिलांनी त्याचं उत्तर भावनात्मक आधार हे दिलं. आयुष्यभराचा साथीदार मिळणं हा लग्नाचा सर्वात मोठा फायदा असल्याचं ३३.७ टक्के पुरुष आणि ४५.२ टक्के महिलांनी सांगितलं.