सनी लियॉनीची डिग्री नकली -सुब्रमनियन स्वामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 20:03 IST
केजरीवाल आणि रघुराम राजन यांची डिग्री नकली सांगणारे सुब्रमनियन स्वामी हे काही थांबायला तयारच नाहीत...
सनी लियॉनीची डिग्री नकली -सुब्रमनियन स्वामी
केजरीवाल आणि रघुराम राजन यांची डिग्री नकली सांगणारे सुब्रमनियन स्वामी हे काही थांबायला तयारच नाहीत. स्वामींनी पुढील निशाणा साधला आहे तो सरळ बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लियॉनवर.. स्वामीने सनी लियॉनवर आरोप लावले आहेत की, सनीची डिग्री नकली आहे. स्वामीने आपल्या खुलाशात म्हटले आहे की, जेव्हा त्यांनी सशा ग्रे आणि मिया खलीफाची एक्टिंग पाहिली तेव्हा त्यांना समजले की, सनी लियॉनची डिग्री नकली आहे. सनीला एक्टिंगची एबीसीदेखील येत नाही. स्वामी सांगत आहेत की, ते सनीच्या विरू द्ध सुप्रीम कोर्ट जाणार. सनीला याबाबत विचारण्यात आले की, आपणावर स्वामींनी लावलेल्या आरोपाबाबत काय सांगाल? तर सनीने सांगितले की, ‘मला असे वाटते की, स्वामीने माझे बॉलिवूडचेच चित्रपट पाहिले आहेत. त्यांनी माझे हॉलिवूड चित्रपटदेखील पाहावेत. माझ्या हॉलिवूड चित्रपटांचे कलेक्शन त्यांच्याच पार्टीतल्या नेतांजवळ आहे, ज्याला पाहताना क र्नाटक विधानसभामध्ये पाहताना रंगेहात पकडण्यात आले होते.