शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

​‘वन इंडियन गर्ल ’ भारतीय मुलींची कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 17:58 IST

तरुणांचा लाडका लेखक चेतन भगतची आगामी कादंबरी ‘वन इंडियन गर्ल’ला प्रकाशनापूर्वीच इंंटरनेटवर तुफान प्रतिसाद मिळतोय.

तरुणांचा लाडका लेखक चेतन भगतची आगामी कादंबरी ‘वन इंडियन गर्ल’ला प्रकाशनापूर्वीच इंंटरनेटवर तुफान प्रतिसाद मिळतोय. या पुस्तकाने एका आॅनलाईन शॉपिंग वेबसाईटवर प्री-आॅर्डर बुकिंगचे सर्व विक्रम मोडित काढले. भारतामध्ये इंग्रजी साहित्याची वाढती मागणी पाहता अनेक नव लेखक इंग्लिशमधून कांदबऱ्या लिहू लागले आहेत.भारतामध्ये ‘कॅम्पस नॉव्हेल्स’ या साहित्यप्रकाराचा जनक म्हणून चेतन भगतची ओळख सांगितली जाऊ शकते. बँकर-टू-रायटर असा त्याचा प्रवास आहे. ‘फाईव्ह पॉर्इंट समवन’ या कादंबरीमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेल्या चेतनच्या पुढील पुस्तकाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.पुस्तकाविषयी तो सांगातो की, ‘ही एका हुशार, कर्तृत्ववान आणि स्वत:च्या पायावर उभ्या असलेल्या मुलीची कथा आहे. तिच्या अशा याच गुणांमुळे खरे प्रेम तिला मिळणे कठिण जाते. आपल्या समाजात इंडिपेंडन्ट मुलींना नेहमीच डावलण्यात येते. आपण कुठे तरी याविषयी लिहावे अशी माझी इच्छा होती. म्हणूनच मी ही कादंबरी ‘स्त्रीवादी’ दृष्टीकोनातून लिहिली आहे.एखाद्या मुलीच्या डोक्यात काय चालते, ती कसा विचार करते, आजूबाजूच्याच्या परिस्थितीकडे कशी बघते याचा शोध घेण्यासाठी मी ही कांदबरी लिहिली, असे तो सांगतो. चेतन भगतच्या यापूर्वी प्रकाशित कादंबऱ्यांवर चित्रपट बनले आहेत. या कांदबरीवर सिनेमा निघतो का हे पाहणे रंजक ठरेल.