शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

आॅफ शोल्डर ,कोल्ड शोल्डर कोण म्हणतं ही फॅशन जुनी आहे? शिल्पा अनुष्का आणि भूमीकडे पाहा ना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 20:01 IST

वॉर्डरोबमध्ये तुम्हाला काही प्रॉमिनन्ट बदल करायचा असेल तर तुम्ही एकदा तरी आॅफ शोल्डर आणि कोल्ड शोल्डर ट्राय करून पाहायला हवेत.

ठळक मुद्दे* आॅफ शोल्डर ड्रेसेसमध्ये शोल्डर स्ट्रॅप्स नसतात. त्यामुळे शोल्डर लाईन पूर्णत: ओपन असते.* कोल्ड शोल्डर ड्रेसेसमध्ये नेकलाईन असते तसेच शोल्डर स्ट्रॅप्सही असतात. परंतु एक्झॅक्टली खांद्याच्या पोर्शनच्या स्लीव्ह्ज नसतात.* बाजारात आणि आॅनलाईन शॉपिंग वेबसाइट्सवर सध्या या प्रकारच्या ड्रेसेसची असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत. मॅक्सी ड्रेसेसमध्ये तर हमखास हा प्रकार दिसतो.

 

- मोहिनी घारपुरे-देशमुखसाधारणत: 80 च्या दशकात बूममध्ये असलेला आॅफ शोल्डरचा ट्रेण्ड आता पुन्हा नव्यानं आला आहे. त्याचबरोबर कोल्ड शोल्डर हा नवा प्रकारही फारच लोकप्रिय झाला आहे.मुलींच्या वॉर्डरोबमधील कपड्यांमध्ये अत्यंत सुंदर आणि सुपर फेमिनाईन दिसणारे हे दोन्हीही प्रकार. या दोन्हीहीमध्ये वरवर पाहिलं तर फार मोठा फरक दिसणार नाही परंतु तरीही बेसिक सारखं असलं तरीही सूक्ष्मसा पण प्रकर्षानं दिसणारा बदल केल्यानं हे दोन्हीही प्रकार निराळे दिसतात.

आॅफ शोल्डर ड्रेसेसमध्ये शोल्डर स्ट्रॅप्स नसतात. त्यामुळे शोल्डर लाईन पूर्णत: ओपन असते. हे ड्रेसेस खूपच छान दिसतात. विशेषत: आॅफ शोल्डर ड्रेस आणि ब्रेस्ट लाईनला हायलाईट करणारे रफल्स असे शॉर्ट ड्रेसेस खूपच लोकप्रिय आहेत. अनेक उंच महिला पार्टीला जाताना असेच ड्रेसेस प्रेफर करतात. यामुळे सेक्सी, कॅज्युअल आणि आणि वेस्टर्न लुकचा तोल साधणण शक्य होतं.

कोल्ड शोल्डर ड्रेसेसमध्ये नेकलाईन असते तसेच शोल्डर स्ट्रॅप्सही असतात. परंतु एक्झॅक्टली खांद्याच्या पोर्शनच्या स्लीव्ह्ज नसतात. त्यामुळे संपूर्ण शोल्डर लाईन नव्हे तर फक्त खांद्यांचा भाग उघडा दिसतो. परंतु गळा आणि छातीचा भाग झाकलेल्या स्थितीत असतो. या ड्रेसेसमध्ये बेल स्लीव्हस, थ्री फोर्थ स्लीव्हस, फुल स्लीव्हस असे पॅटर्नस दिसतात.

हे ड्रेसेस केवळ शॉर्ट नसून लाँग ड्रेसेसही खूपच सुंदर दिसतात. अलिकडे अनेक बॉलीवूड अ‍ॅक्ट्रेसेसनी कोल्ड शोल्डर ड्रेसेसला पसंती दिली आहे. या ड्रेसेसबरोबर हाय हिल्सच शोभून दिसतात.आपल्याकडे पारंपरिक समारंभ वगळता अन्य लहानमोठ्या समारंभांना आॅफ शोल्डर आणि कोल्ड शोल्डर ड्रेसेस ट्राय करायला काहीच हरकत नाही. हे ड्रेसेस इतके सुंदर दिसतात की त्यामुळे व्यक्तिमत्त्व उठून दिसायलाही मदत होते.

बाजारात आणि आॅनलाईन शॉपिंग वेबसाइट्सवर सध्या या प्रकारच्या ड्रेसेसची असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत. मॅक्सी ड्रेसेसमध्ये तर हमखास हा प्रकार दिसतो. तुम्हाला जर तुमच्या वॉर्डरोबमध्ये काही प्रॉमिनन्ट बदल करायचा असेल तर तुम्ही एकदा तरी आॅफ शोल्डर आणि कोल्ड शोल्डर ट्राय करून पाहायला हवेत.