भारतात चित्रीकरण करायला आवडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 03:55 IST
भारतात चित्रीकरण करायला आवडेलडेनियल क्रेगने बॉण्डपटांमध्ये चांगलाच जम बसवला आहे. जागतिक प्रेक्षक त्यांच्या चौथ्या बॉण्डपटाची वाट पाहात आहे. स्पेक्ट्रम' हा चित्रपट काहीच दिवसांत झळकणार आहे.
भारतात चित्रीकरण करायला आवडेल
डेनियल क्रेगने बॉण्डपटांमध्ये चांगलाच जम बसवला आहे. जागतिक प्रेक्षक त्यांच्या चौथ्या बॉण्डपटाची वाट पाहात आहे. स्पेक्ट्रम' हा चित्रपट काहीच दिवसांत झळकणार आहे. डेनियल सांगतो, जवळपास तीन वर्षांआधी शाहरुख खानने आपल्याला बॉण्डपटात अभिनय करण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवले होते. स्कायफाल'मधील रेल्वेचे चित्रीकरण भारतात करण्याचे ठरले होते. त्याचे पुढे काय झाले? यावर क्रेग म्हणतो, मला याविषयी सविस्तर सांगता येणार नाही. पण भारतात चित्रकरण करायला मला आवडेल.