शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

SELFIE PROJECT: तो काढतोय ३० वर्षांपासून रोज ‘सेल्फी’! वाचा त्याची अद्भूत कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 16:22 IST

‘सेल्फी’ क्रेझ जरी मागच्या सात-आठ वर्षांपासून आलेली असलेली तरी बॉस्टन शहरात एक अवलिया राहतोय तो मागच्या तीस वर्षांपासून रोज सेल्फी काढतोय. होय, ‘सेल्फी’ शब्द अस्तित्वात आणि प्रचलित होण्याच्या फार पूर्वीपासून कार्ल बेडेन हे बॉस्टन कॉलेजमधील प्रोफेसर दैनंदिन स्वत:चा एक फोटो घेत आहेत.

आजपासून ठीक तीस वर्षांआधी म्हणजेच २३ फेब्रुवारी, १९८७ रोजी बेडेन यांनी ‘एव्हरी डे’ नावाने हा अनोखा प्रोजेक्ट सुरू केला होता. त्यांच्या या कामगीरीमुळे त्यांना ‘सेल्फीचा जनक’ म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. अमेरिकेतील मॅसेच्युएटस् येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय बेडेन यांना आज लोक जे सेल्फी म्हणून फोटो काढतात ते मुळीच आवडत नाही.ते म्हणतात, मी जेव्हा हा प्रोजेक्ट सुरू केला होता तेव्हा मला वाटले नव्हते की, एक दिवस त्याला ‘सेल्फी’ असे गोंडस नाव मिळेल आणि त्याचा मी जनक असेल. आजच्या तरुणांना सेल्फीचे प्रचंड वेड आहे. परंतु सोशल मीडियावर विनाकारण सेल्फी शेअर करणे मला आवडत नाही. पण हेदेखील तेवढेच खरे आहे की, सेल्फीची क्रेझ आली नसती तर मला आजएवढी प्रसिद्धी मिळाली नसती.बॉस्टनमध्ये दोन वेळा बेडेन यांच्या सल्फींचे छायाचित्र प्रदर्शन भरवणारे हॉवर्ड येझरस्क सांगतात की, ‘माणसाला कोणत्या कोणत्या स्वरुपात स्वत:ला अमर ठेवायचे असते. शक्य असेल त्या माध्यमातून आपली ओळख कायम राखण्यासाठी त्याची धडपड असते. अशाच प्रकारच्या अनेक मानवीय वृत्तींना या प्रोजेक्टद्वारे स्पर्श करण्यात आला आहे.‘एव्हरी प्रोजेक्ट’च्या दशकपूर्तीच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये प्रदर्शन भरवणारे राबर्ट मन म्हणतात की, बेडेन यांनी सुरू केलेला हा प्रोजेक्ट केवळ वैयक्तिक नसून त्यामध्ये एक प्रकारची वैश्विकतादेखील आहे. आपण सर्व जण त्याच्याशी स्वत:ला जोडू शकतो. व्यक्तीचे वाढते वय अशा कलात्मकपद्धतीने कॅमेऱ्यात कैद झालेले पाहणे म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे.ALSO READ: ​‘सेल्फी’ पाहत बसल्याने कमी होतो आत्मसन्मान