शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

​ बघा : वाडियारचे महाराज यदुवीर यांचा शाही विवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 17:54 IST

वाडियार राजघराण्याचे महाराज यदुवीर आज सोमवारी (27 जून) विवाह बंधनात अडकले.

वाडियार राजघराण्याचे महाराज यदुवीर आज सोमवारी (27 जून) विवाह बंधनात अडकले.  राजस्थानमधील डूंगरपूरची राजकुमारी तृषिका सिंहसोबत यदुवीर यांनी लग्नगाठ बांधली. गेल्या वर्षी यदुवीर यांचा राज्याभिषेक झाला होता.  म्हैसूरमध्ये मंडप पुजे सह लग्नाच्या विधींना शनिवारपासून सुरुवात झाली. सकाळी 9.05 ते 9.40 दरम्यान म्हैसूर पॅलेसच्या कल्याण मंडपमध्ये विवाह विधी पार पडले..त्याधी 25 जून रोजी सकाळी यदुवीर यांना येन स्नान (आॅइल बाथ) करण्यात आला  रविवारी एका खासगी समारंभात काशी यात्रा विधी झाला.  लग्नाच्या दिवशी म्हणजे आज  यदुवीर आमि तृषिका झोपाळ्यावर झोके घेतील आणि त्यानंतर फुलांनी तयार केलेल्या बॉलसोबत खेळतील. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता दरबार हॉलमध्ये ग्रँड रिसेप्शन दिले जाईल.   या शाही जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी 2000 पाहूणे येणार आहेत. त्यात पंतप्रधान मोदींचाही समावेश असेल.   यदुवीर यांचे सासरे - तृषिकाचे वडील हर्षवर्धन सिंह यांची नुकतीच भाजपच्या तिकीटावर राज्यसभेवर वर्णी लागली आहे.   भारतातील राजघराण्यांपैकी सर्वात जुने (619 वर्षे) राजघराणे म्हणून म्हैसूरच्या वाडियार घराण्याची ओळख आहे. 24 वर्षांचे महाराज यदुवीर वडियार मागील वर्षी अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्स विद्यापाठातून इंग्रजी आणि अर्थशास्त्रात पदवी घेऊन परतले आहेत.  महाराज झाल्यानंतर ते कृष्णदत्ता चामराजा वाडियार नावानेही ओळखले जात आहेत.   गेल्या वर्षी 23 फेब्रुवारीला महाराणीने त्यांना दत्तक घेतले होते आणि राजा करण्याची घोषणा केली होती.  वाडियार घराण्याने 1399 पासून म्हैसूरवर राज्य करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून राजाची घोषणा होत आली आहे.  यापूर्वी 1974 मध्ये राज्याभिषेक झाला होता. तेव्हा यदुवीर यांचे काका श्रीकांतदत्ता नरसिंहराजे वाडियार हे गादीवर बसलेले होते.  2013 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षे गादी रिकामी होती. त्यानंतर यदुवीर यांना राजा करण्यात आले.  श्रीकांतदत्ता नरसिंहराजे वाडियार आणि राणी गायत्रीदेवी निपुत्रीक होते.