शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

रेट्रो लूक घरही सजवतो!

By admin | Updated: April 28, 2017 17:28 IST

रेट्रो लूकला २०१७ मध्येही पसंती दिली जातेय ती घर सजावटीसाठी. घर सजावटीसाठी रेट्रो लूक फर्निचरचा ट्रेंड नव्यानं लोकप्रिय होतोय. तुम्हालाही हवाहवासा वाटतो ना रेट्रो लूक..नक्की ट्राय करा.

 

-सारिका पूरकर-गुजराथी

 

काही दिवसांपूर्वी सतर-ऐंशीच्या दशकातील फॅशनची अर्थात रेट्रो लूकची पुन्हा चलती होती. पोलका डॉट्स, बेलबॉटम पॅण्ट्स, मोठ्या फ्रेमचे गॉगल्स...आता याच रेट्रो लूकला २०१७ मध्येही पसंती दिली जातेय ती घर सजावटीसाठी. घर सजावटीसाठी रेट्रो लूक फर्निचरचा ट्रेंड नव्यानं लोकप्रिय होतोय. तुम्हालाही हवाहवासा वाटतो ना रेट्रो लूक..नक्की ट्राय करा. कारण स्वस्तात मस्त असंही या सजावटीचं दुसरे नाव आहे.

 

* केन फर्निचर

रेट्रो लूकसाठी खूप मोठा हातभार लागणार आहे तो केन फर्निचरचा. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास बांबू आणि वेताच्या काड्यांपासून बनवलेलं फर्निचर. यामध्ये फर्निचरमधल्या जवळ जवळ सर्वच गोष्टी उपलब्ध आहेत.

१) खुर्च्या :- वेताच्या खुर्च्या या मध्यम उंचीच्या, चौकोनी आकारातील निवडा. त्यावर छानसे सीटींग घाला. यामुळे चिकी स्टाईल लूक मिळेल.

२) झुला :- घरातील दिवाणखाना किंवा टेरेस, बाल्कनीत केनचा झुला टांगा. हा झुला दिसायला तर क्युट दिसतोच शिवाय इतर मेटलच्या झुल्यांपेक्षा जास्त कम्फर्टदेखील देतो.

३) कॉफी टेबल :- गोलाकारातील कमी उंचीचा (खुर्चीच्या उंचीपेक्षा कमी, सहसा आपण एकाच उंचीचे घेतो तसे न घेता) वेताचा कॉफी टेबल निवडा.

४) बेड :- बेडरुममधील बेडफ्रेम देखील केनची घ्या.डेबेड (सोफा कम बेड)असेल तर शक्यतो छान एैसपैस घ्या. हॅण्ड सुंदर डिझाईनचे निवडा.

५) ओटोमन:- दिवाणखान्यात सोफा, खुर्च्या यांच्या जोडीला हा वेताचा ओटोमन (बसका, गोलाकार छोटा स्टूल) असेल तर सुंदरच दिसेल अजून.

६) टी कार्ट- घरातील टेरेस, पोर्च, परसबागेत बसून चहाचा आस्वाद घेण्यासाठी टी-कार्ट ( चहासाठी कप, बशा आणि इतर साहित्य वाहून नेणारी ट्रॉली म्हणता येईल)वापरले जातात, ते देखील वेताचे घ्या. यामुळे रेट्रो लूकला परिपूर्णता मिळते.

७) बास्केट्स :- वेताच्या बास्केट्स या तर किचनबरोबरच अन्य रुममध्येही घर सजवण्यासाठी, वस्तू ठेवण्यासाठी आॅल टाईम हिट आहेत.

८) डायनिंग खुर्च्या :- बेताच्या उंचीच्या वेताच्या खुर्च्या आणि जोडीला लाकडी तेवढ्याच उंचीचे लाकडी बेन्चेस, लाकडी टेबल हे रेट्रो लूक देणारे सर्वोत्तम पर्याय आहेत.

 

                                        

मॅक्रमच्या वस्तूंनी करा डेकोरेट: केन फर्निचरप्रमाणेच मॅक्रम (एक प्रकारचा धागा, जो जाड-बारीक स्वरुपात मिळतो)पासून बनविलेल्या कलात्मक वस्तूही रेट्रो लूक सजावटीसाठी वापरल्या जाताहेत.

१) प्लाण्ट होल्डर :- छोटी-छोटी फुलझाडं, इनडोअर -आऊटडोअर प्लाण्ट्सच्या कुंड्या ठेवण्यासाठी मॅक्रमचे प्लाण्ट होल्डर खूपच सुंदर दिसतात.

२) लॅम्प्स:- आकाशकंदीलाच्या आकारात विणलेले मॅॅक्रमचे लॅम्प्स दिवाणखान्यातील कोपऱ्यात उठून दिसतात.

३) वॉलहॅगिंग:- मॅक्रमचे वॉलहॅँगिंग खूपच आकर्षक दिसतात. हव्या त्या रंगसंगतीत, विविध डिझाईन्समध्ये ते बनविले जातात. गणपती चेहरा असलेले वॉलहॅँगिंग विशेष लोकप्रिय आहे. याचा आकार मात्र मोठा हवा,म्हणजे छान लूक मिळतो.

४) मिरर :- मॅक्रमच्या विणकामात बसवलेला आरसाही कोणत्याही भिंतीवर शोभून दिसतो.

५) पिलो कव्हर:- चौकोनी पिलोजवर मॅक्रमचे कव्हर घालून सोफ्यावर अरेंज केल्यास डेकोरेशनची शान वाढते.

६) रनर-डायनगिं टेबलवर मॅक्रमचे रनर घातल्यास होमी टच मिळतो.