शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

घरामध्येच आॅफिस करताय मग या 9 गोष्टी लक्षात ठेवा!

By admin | Updated: May 5, 2017 17:00 IST

प्रत्येक घरात छोटेखानी आॅफिस ही आता काळाची आणि बदलत्या कामाच्या शैलीची गरज बनली आहे. तुमच्या घरातही आहे का आॅफिस असेच? मग त्या आॅफिसच्या सजावटीसाठी काही केलंय तुम्ही?

 

- सारिका पूरकर-गुजराथी

असं म्हणतात की आॅफिसचं काम घरी आणू नये. परंतु, आता दिवसाचे १८-२० तास कामाचे झालेत. त्यामुळे साहजिकच घरीच आॅफिस असणं आवश्यक आणि सोयिस्कर झालं आहे. कारण घरातल्या आॅफिसमुळे महत्वाची कामं घरबसल्या होऊ लागली आहेत, शिवाय महिलांसाठी तर वर्क फ्रॉम होम अर्थात घरी बसून काम ही संकल्पनाही लाभदायी ठरु लागली आहे. थोडक्यात प्रत्येक घरात छोटेखानी आॅफिस ही आता काळाची आणि बदलत्या कामाच्या शैलीची गरज बनली आहे. तुमच्या घरातही आहे का आॅफिस असेच? मग त्या आॅफिसच्या सजावटीसाठी काही केलंय तुम्ही? आता आॅफिसच ते.. ते काय सजवायचं? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो पण सजावटीची गरज आॅफिसलाही असते. स्वच्छ, नीट नेटक आणि आकर्षक आॅफिस असेल तर काम करायला उत्साह येतोच शिवाय कामासाठी म्हणून आलेल्यांनाही आपल्या आॅफिसकडे पाहून प्रसन्न वाटतं.

 

घरातलं आॅफिस सजवायचं कसं?

१) घरी आॅफिसची रचना करताना पुस्तकांचे कपाट, कॉम्प्युटर टेबल एकाच ठिकाणी ठेवायला हवे. तसे ते ठेवून घ्या. बसण्यासाठी आॅफिस चेअर्सच वापरा, जेणेकरुन तो कम्फर्ट मिळेल. सहज मुव होता येईल. आॅफिससाठी संपूर्ण वेगळी खोली उपलब्ध नसेल तर मोठ्या खोलीत पार्टिशन करुन आॅफिस बनवा. असं मटेरिअल वापरून घरातील टेरेस, बाल्कनीही आॅफिस म्हणून वापरू शकता.

२) पुस्तकांच्या कपाटास (लाकडी असेल तर) निळसर राखाडी रंगात रंगवा. आॅफिससाठी जी काही जागा उपलब्ध आहे, त्या जागेवर छानसे रग अंथरा. यासाठी पारंपरिक डिझाईन्सचे रग नकोत. त्याऐवजी स्टार्क पॅटर्न रग छान वाटतात.

३) आॅफिसमधील भिंतीवर एखादं छानसं पेटिंग लावू शकता. मात्र हे पेंटिंग तुम्हाला सकारात्मक उर्जा, संदेश देणारं हवं.

४) भिंतींना शक्यतो पांढरा रंग किंवा फिकट रंगच द्या, जेणेकरुन जास्त प्रकाश परावर्तित होऊन फ्रेशनेस कायम राहील. ब्राऊन रंगाचा वापरही आॅफिसच्या इंटिरिअरसाठी करता येतो. वूड पॅनल्स भिंतीवर लावता येतात.

५) आॅफिसची महत्वाची कागदपत्रं, तसेच स्टॅपलर, पिन्स, पेपरवेट, पेन इ.स्टेशनरी ठेवण्यासाठी उपलब्ध जागेचा योग्य वापर करा. टेबलची ड्रॉवर्स तर असतातच शिवाय जोडीला छोटेखानी कपाटं मिळतात, त्याचाही वापर करु शकतात. स्टोअरेजला कंटेपररी लूक हवा असेल तर पेपर आॅर्गनायझर्स, बास्केट्स, वॉल शेल्फ, ओपन स्टोअरेज सिस्टिमचाही उपयोग करता येतो.

 

                               

६) घरातील आॅफिसमध्ये प्रकाशयोजनाही महत्वाची आहे. शक्यतो नैसर्गिक प्रकाश जास्त येईल याची काळजी घ्या. मोठ्या खिडक्या ज्या खोलीत असतील तेथे तुम्ही आॅफिस करु शकता. तसेच रात्री काम करण्यासाठी ओव्हरहेड लाईट, टेबललॅम्प हे चांगले पर्याय आहेत. आकर्षक लॅम्पशेडचा वापर करुनही या आॅफिसला डेकोरेटिव्ह लूक देता येतो. मात्र त्यासाठी मोठे तसेच डिझाईनचे लॅम्पशेड नकोत. फॉर्मल लूक देणारे लॅम्पशेड हवेत.

७) जर तुमच्या घरच्या आॅफिसमध्येही तुमच्या व्यवसायाशी निगडित व्यक्ती येत राहणार असतील तर त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था हवी. त्यासाठी छोटा सोफा, एक सेंटर टेबल ठेवायला हवा. शक्य झाल्यास खुर्च्याही ठेवण्यास हरकत नाही.

८) जर तुम्हाला आॅफिससारखे टिपिकल आॅफिस घरी नको असेल तर तुम्ही बेडरुम, हॉलमध्येही एखादा टेबल अरेंज करुन कॉर्नर आॅफिस तयार करुन तेथे वर्क विथ फॅमिली हा पर्यायही निवडू शकता.

९) पांढऱ्या रंगाचा डेस्क, अल्फाबेट डिझाईनचा, मॅप (नकाशा) वॉलपेपर,कॉर्कबोर्ड यांचा वापर करुनही घरच्या आॅफिसला मॉडर्न टच देता येतो.