मधुमेहावर रेड वाईन लाभदायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:18 IST
मधुमेहाने त्रस्त असणार्या लोकांना विचारा ते सांगतील की विविध प्रकारची पथ्ये पाळताना त्यांना कशी तारेवरची कसरत करावी लागते.
मधुमेहावर रेड वाईन लाभदायक
मधुमेहाने त्रस्त असणार्या लोकांना विचारा ते सांगतील की विविध प्रकारची पथ्ये पाळताना त्यांना कशी तारेवरची कसरत करावी लागते. हे खाऊ नका, ते पिऊ नका, इतकेच खावे अशा एका ना अनेक गोष्टींवर लक्ष द्यावे लागते. मात्र अशा लोकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. एका नव्या रिसर्चनुसार टाईप-२ मधुमेहावर रेड वाईन फार उपयुक्त असल्याचे समोर आले आहे. रोज रात्री एक ग्लास रेड वाईन पिल्यामुळे टाईप-२ मधूमेह असणार्या लोकांमध्ये कोलेस्टेरॉल आणि हृदयाचे आरोग्य नियंत्रित करण्यास मदत होते. डायबिटिज् असणार्या लोकांना हृदयविकाराचा धोका सामान्य लोकांपेक्षा जास्त असतो. याचे मुख्य कारण आहे चांगल्या कोलेस्टेरॉलची कमतरता.