शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

​न्यूझीलंडमध्ये ड्रोनद्वारे पिझ्झा डिलिव्हरीला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 19:42 IST

न्यूझीलंडमध्ये ड्रोनद्वारे पिझ्झा डिलिव्हरी करण्यास परवानगी दिली असून, असे करणारा तो पहिला देश आहे.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं आपल्या जगण्याच्या पद्धती आणि आसपासचे जग झपाट्याने बदलत आहे. घरपोच सेवांचा वापर वाढतो आहे. एका क्लिकसरशी वस्तू घरी मिळतात. त्यामध्ये पिझ्झा डिलिव्हरी तर सर्वांचीच फेव्हरेट. पिझ्झाप्रेमींना खुश खबर म्हणजे न्यूझीलंडमध्ये ड्रोनद्वारे पिझ्झा डिलिव्हरी करण्यास परवानगी दिली असून, असे करणारा तो पहिला देश आहे.न्यूझीलंडचे वाहतूक मंत्री सिमॉन ब्रिजेस यांनी या बातमीला दुजोरा देत सांगितले की, डॉमिनोज् पिझ्झा इंटरप्राईजेस आणि ड्रोननिर्माता कंपनी फ्लर्टी यांनी मिळून ‘मानवरहित पिझ्झा डिलिव्हरी’ सुविधेची सुरूवात केली आहे. हवाई नियमनाचे आधुनिक व पुरोगामी कायद्यांमुळे दोन्ही कंपन्यांनी न्यूझीलंडची निवड केली आहे.गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये न्यूझीलंडने स्वीकारलेल्या नव्या कायद्यामध्ये ‘अनमॅनड् एरिअल वेईकल’ (यूएव्ही) म्हणजेच ड्रोनचा व्यवसायिक उपयोग करण्याची तरतुद करण्यात आली आहे. पिझ्झा डिलिव्हरीसाठी ड्रोनला परवानगी देऊन न्यूझीलंडने जगभरातील टेक्नोकंपन्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे धोरण अवलंबविले आहे.लवकरच चालकरहित/स्वयंचलित प्रवासी वाहतूकसेवांना परवानगी देण्यासाठी कायद्याचा पुनर्विचार करण्यात येणार असल्याची माहितीदेखील ब्रिजेस यांनी दिली. मार्च महिन्यात एका पिझ्झा कंपनीने रोबोटद्वारे पिझ्झा डिलिव्हरी करण्याचा प्रयोग न्यूझीलंडमध्ये सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती.