ऑनलाइन तिकीट बुकिंगचा पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 05:52 IST
ऑनलाइन तिकीट बुकिंगचा चांगला आणि जलद पर्याय आता उपलब्ध झाला आहे.
ऑनलाइन तिकीट बुकिंगचा पर्याय
मात्र त्यातही इतके अँप्स आणि संकेतस्थळे सुरू झाली आहेत की, त्यावरील वेगवेगळ्या किमती आपल्याला संभ्रमात पाडतात. अशा सर्व संकेतस्थळांची तुलना करून एकाच ठिकाणी पाहायचे असेल तर 'कायाक' हे अँप अतिशय उत्तम आहे. विविध कंपन्यांच्या विमान सेवेची तुलना, हॉटेल, कारचे बुकिंग, निवासाचे वेगवेगळे पर्याय, विमानाच्या वेळेचे 'ट्रॅकिंग', विमानावरील खानपानाची निवड, विमानतळाची माहिती अशा अनेक गोष्टी या अँपवर उपलब्ध आहेत.