शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

​OMG : पती ‘पॉर्न’च्या आहारी, पत्नीची सुप्रीम कोर्टात धाव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 12:47 IST

‘माझा पती पॉर्न साईट्सच्या आहारी गेला आहे. त्यामुळे मला आणि आमच्या मुलांना त्रास होतो. सरकारने आक्षेपार्ह वेबसाईट्सवर बंदी घालावी, अशी मागणी सुप्रीम कोर्टात केली आहे.

-Ravindra Moreएका महिलेचा पती सतत पॉर्न पाहत असल्याने त्याचा त्रास स्वत: तिला आणि मुलांना होत असल्याने त्या महिलेने सरळ सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यात त्या महिलेने, ‘माझा पती पॉर्न साईट्सच्या आहारी गेला आहे. त्यामुळे मला आणि आमच्या मुलांना त्रास होतो. सरकारने आक्षेपार्ह वेबसाईट्सवर बंदी घालावी, अशी मागणी सुप्रीम कोर्टात केली आहे. संबंधित महिला मुंबईतील समाजसेविका असून पतीच्या या सवयीला त्रस्त होऊन शेवटी तिने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. पॉर्न साईट्स पाहण्याच्या पतीच्या सवयीमुळे आपलं वैवाहिक आयुष्य बर्बाद झालं आहे, त्यामुळे केंद्र सरकारने अशा प्रकारच्या आक्षेपार्ह साईट्सवर बंदी घालण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलावी अशी याचिका महिलेने केली आहे.‘माझा पती रोजचा बहुतांश वेळ पॉर्नोग्राफिक व्हिडिओ आणि फोटा पाहण्यात घालवतो. त्याचं पूर्ण लक्ष त्याकडेच वेधलं गेल्याने आमच्या वैवाहिक जीवनात खोडा पडला आहे’ असं याचिकाकर्त्या महिलेने म्हटलं आहे. आपण ३० वर्ष सुखाने संसार केला, मात्र २०१५ मध्ये त्यांना ही सवय जडली आणि दोन मुलांचा पिता असलेला माझा नवरा पॉर्नच्या आहारी गेला, असं महिलेने म्हटलं आहे. अश्लील व्हिडिओ पाहणं हा गुन्हा नसला, तरी त्यामुळे महिलांविरोधी गुन्ह्यात वाढ होत असल्याचं महिलेनं म्हटलं आहे.गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुप्रीम कोर्टाने चाईल्ड पॉर्नोग्राफीवर बंदी आणण्यासाठी सरकारला सुचवलं होतं. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देश काहीही खपवून घेऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं होतं.Also Read : ​आपणही चोरून ‘पॉर्न’ पाहता? तर एका भयंकर आजाराच्या कचाट्यात आहात आपण !