OMG : ‘या’ कारणाने दाढी वाढलेल्या मुलाकडे आकर्षित होतात मुली !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 18:02 IST
एका नव्या संशोधनात मोठा खुलासा करण्यात आला आहे. ज्या मुलांना जितकी लांब दाढी तितक्या मुली त्या मुलावर जीव ओवाळतात. कारण दाढी असलेले मुले त्यांना अधिक आकर्षक वाटतात.
OMG : ‘या’ कारणाने दाढी वाढलेल्या मुलाकडे आकर्षित होतात मुली !
दाढी वाढविणे जणू आजच्या तरुणाईची फॅशनच झाली आहे. विशेषत: बहुतके चित्रपटातही दाढी वाढवलेले नायक दिसून येत आहेत. त्यांचेच अनुकरण करुन बरेच तरुणही दाढी वाढविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. दुसरी गोष्ट अशी की, एका नव्या संशोधनात मोठा खुलासा करण्यात आला आहे. ज्या मुलांना जितकी लांब दाढी तितक्या मुली त्या मुलावर जीव ओवाळतात. कारण दाढी असलेले मुले त्यांना अधिक आकर्षक वाटतात. आॅस्ट्रेलियाच्या बॅरेंबी डिक्सन युनिव्हर्सिटीने नुकतेच मुलांच्या दाढीवर एक अध्ययन केले आहे. या संशोधनानुसार, ज्या मुलांची लांब दाढी असते त्या मुलांकडे गर्लफ्रेन्ड किंवा त्याची पत्नी जास्त आकर्षित होते. त्यामुळे तुम्हाला जर मुलींना खूश करायचं असेल तर चुकूनही दाढी करू नका. शोधकर्त्यांनी यामागचं कारण सांगितलं की, ज्या मुलांची दाढी वाढलेली असते ते मुलं मुलींना जास्त चार्मिंग आणि सेक्सी वाटतात. अशा मुलांसोबत मुली चांगल्या वागतात. अशा मुलांची प्रत्येक गोष्ट मुलींच्या मनात घर करून जाते. याआधीही यावर अनेक शोध करण्यात आले आहेत. त्यातूनही हेच समोर आलंय की, मुलींना मॅच्योर मुलं जास्त आवडतात. कारण असे मुलं त्यांच्या मनाला चांगलं समजू शकतात. यासोबतच जबाबदाऱ्या चांगल्या पार पाडतील. ज्या मुलांची दाढी वाढलेली असते ते मुलं मुलींना जास्त समजू शकतात असं मुलींना वाटतं. तेच जी मुलं क्लिन शेव करतात त्यांच्यात मुलींना बालीशपणा दिसून येतो. त्यांच्याकडे मुली कमी आकर्षित होतात. तसेच त्यांचं रिलेशनही जास्त दिवस टिकत नाही. Also Read : Beauty : ‘या’ फायद्यांमुळे काही अभिनेते ठेवतात फुल दाढी ! : Beauty Tips : रुबाबदार दाढीसाठी सेलिब्रिटीदेखील करतात हे उपाय !source : india.com